Ads Area

SWACHH VIDYALAYA PURASKAR Register And Information

स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती भरणे मुदतवाढ

स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती 2021 - 2022

स्वच्छ विद्यालय पुरस्कार नोंदणी बाबत मा.आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

त्या अनुषंगाने स्वच्छ विद्यालय पुरस्कार नोंदणी १००% होईल

 दिनांक 15 एप्रिल मुदतवाढ पर्यंत देण्यात आलेली आहे.
 स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती आपण सहज मोबाईल वर भरू शकतो. 
यासाठी आपल्याकडे फक्त काही फोटो व माहिती असणे आवश्यक आहे

1 ) शालेय स्वच्छतागृह
2) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
3) Hand wash स्टेशन
4) कचरा व्यवस्थापन
5) शालेय भौतिक सुविधा फोटो

       शाळेची नोंदणी

प्रथम शाळेची नोंदणी झाल्यावर शाळेची लॉग इन करावे त्यानंतर शालेय संबंधित सर्व प्रश्नाचे उत्तर तसेच शालेय फोटो अपलोड करावी सर्व माहिती भरणे आवश्यक आहे 
त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
सर्व शाळेची माहिती व शाळेचे फोटो अपलोड केल्यानंतर डाव्या बाजूला तीन रेषे वर क्लिक करून Final Submit वर क्लिक करा

नामांकन व निवड

   स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी ऑनलाईन नामांकन सादर करण्याची दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत होती
परंतु मुदत वाढ दिनांक 15 एप्रिल पर्यंत वाढवली आहे
 तर जिल्हा स्तरावर पडताळणी व शाळांची पडताळणी ची मुदत एक एप्रिल ते 15 मे 2022 पर्यंत आहे.
 पुरस्कार निवड केलेल्या शाळांची यादी पाठविणे मुदत दिनांक 22 मे 2022 पर्यंत पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड दिनांक 22 मे 2012 पर्यंत करण्यात येईल तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड दिनांक 22  ते 30 जून 2022 पर्यंत करण्यात येईल 
राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करण्याची मुदत
 दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2022 आहे. 
दिनांक 1 जुली ते 7 जुलै राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करण्यासाठी दिनांक 7 जुलै ते 7 सप्टेंबर 2022 राज्यस्तरावरून शाळांची पडताळणी होईल आणि सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येईल. असे देखिल या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

भारत सरकारने स्वच्छ भारत, अभियानाअंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’साठी स्पर्धेची घोषणा केली आहे. शाळेतील पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि कोव्हीड-19 संदर्भातील कामे यांच्या आधारे ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये शहरी, ग्रामीण, शासकीय- निमशासकीय, अशासकीय, निवासी- अनिवासी कोणतीही शाळा सहभागी होऊ शकते. 
        स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम येण्यासाठी आपण ही पोस्ट व या संदर्भातील माहिती आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक,क्षेत्रीयअधिकारी यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच सदर स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत शाळांची नोंदणी वाढावी यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
 *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करावयाची प्रक्रिया :* 
1.या स्पर्धेसाठी मोबाईल ॲप किंवा थेट वेबसाईटच्या माध्यमातून सहभागी होता येते. 
2.या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची पद्धत अत्यंत सोपी असून केवळ यु-डायस कोडच्या आधारे नोंदणी करायची आहे. 
3. वरील पद्धतीने नोंदणी केल्यानंतर एक फॉर्म येईल. त्यातील सर्व प्रश्नांची वस्तुस्थितीनुसार माहिती भरावी. आवश्यक ठिकाणी फोटो अपलोड करावेत व फॉर्म सबमिट करावा. 
4.फॉर्म भरण्यापूर्वी तो पूर्णपणे वाचावा, शक्य झाल्यास प्रिंट घ्यावी व त्यात कच्ची माहिती भरावी व नंतरच ऑनलाईन प्रवेश करून पक्की माहिती भरावी, जेणे करुन काही अडचण येणार नाही. 
5.एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर काही बदल करता येणार नाही.मात्र अपलोड केलेले फोटो केव्हाही बदलता येऊ शकतात. फॉर्म जोपर्यंत सबमिट केला जात नाही तोपर्यंत अनेकदा त्यात बदल करता येऊ शकतो. शिवाय एकाच वेळी सर्व फॉर्म भरणे शक्य झाले नसल्यास पुन्हा तो भरता येतो. 
6.ॲप किंवा वेबसाईटवर फॉम हिंदी किंवा इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. आपल्या सोयीसाठी या फॉर्मची मराठी प्रत सोबतच्या लिंकमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ती अभ्यासून हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा पर्याय निवडून फॉर्म भरावा. 

 *स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी* : 
दिनांक 15 एप्रिल पर्यंत वाढवली आहे शाळांनी नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख आहे, मात्र शेवटच्या क्षणाला वेबसाईटवर ताण वाढून अडथळे निर्माण होण्याचा अनुभव लक्षात घेता त्या आधीच नामांकन नोंदविणे सोयीचे होईल. स्पर्धेचा अंतिम निकाल राष्ट्रीयस्तरावरुन 15 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर होईल.

 *नोंदणी केलेल्या शाळांची मूल्यांकन प्रक्रिया* :
1.शाळेने भरलेल्या माहितीच्या आधारे शाळेतील पाणी,स्वच्छता व आरोग्य तसेच कोव्हीड-19 संबंधित कार्य कोणत्या स्तराचे आहे त्याआधारे शाळेला एक ते पाच स्टार पर्यंत गुण मिळतील. 
2.सर्व स्पर्धा ही 110 गुणांची असून ज्या शाळांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण असतील त्या शाळांना पाच स्टार तर ज्या शाळांना 35 टक्के पेक्षा कमी गुण असतील त्यांना एक स्टार दिला जाईल. त्याआधारे जिल्हास्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर यावर शाळांची विविध टप्प्यात तपासणी होऊन शाळांची निवड होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर 46 शाळा, राज्य पातळीवर 26 शाळा व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येईल. स्पर्धेच्या पारितोषिकामध्ये रोख रक्कम व प्रमाणपत्राचा समावेश आहे.

तरी जास्तीत जास्त मुख्याध्यापक व शिक्षक यांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार या स्पर्धेसाठी शाळांची नोंदणी करावी, यासाठी आपल्या अधिनस्थ शाळा,मुख्याध्यापक,शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्यात यावी. तसेच सदर स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत शाळांची नोंदणी वाढावी यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी


एम.डी. सिंह.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad