Bridge Course Efficacy Survey Of Pre Test

सेतू अभ्यास पूर्व चाचणी नियोजनात बदल| वाचा सविस्तर

पुनर्रचित सेतू अभ्यास सन २०२२-२३ ची परीणामकारकता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणेबाबत

उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. 

 पुनर्रचित सेतू अभ्यास सन २०२२-२३ ची शालेय स्तरावर अंमलबजावणी होणार आहे

Bridge Course 2022 - 2023


 यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर इयत्ता व विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. तसेच या सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी प्रायोगिक तत्वावर इ. २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याचे नमुनाधारित सर्वेक्षण घेण्यात येणार आहे व याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचे  निष्कर्ष प्रसिद्ध केले जाणार आहेत.

त्यासाठी खालील सर्व्हे मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची आपल्या अधिनस्थ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे माहिती संकलित करण्यात यावी असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

सदर संशोधन हे काल मर्यादित असल्याने पुढील नियोजनाप्रमाणे
खालील लिंक वर क्लिक करा


 या लिंकद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी.
अंमलबजावणी कालावधी

1 ) पूर्व चाचणी

राज्यातील शाळा

 दिनांक २० जून ते २५ जून, २०२२

विदर्भ भागातील शाळा

दिनांक  २८ जून ते ०४ जुलै, २०२२

करिता आपण आपल्या स्तरावरून उपरोक्त संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना यासंदर्भात आदेशित करावे. 

तसेच आपल्या स्तरावरून याबाबतचा आढावा घ्यावा.
 आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांनी किती विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली याबद्दलचा गोषवारा संशोधन विभागाच्या researchdept@maa.ac.in 
या ई-मेलवर पाठविण्यात यावा. याबाबतच्या आवश्यक मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत


(मूळ प्रत मा. संचालक महोदय यांनी मान्य केली आहे.)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad