Bridge Course School Level Implementation New Academic Year

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची

शालेय स्तरावर प्रभावी

अंमलबजावणी करणेबाबत

 शालेय स्तरावर सेतू अभ्यासक्रम पूर्ण करताना खालील प्रमाणे नियोजन करणे आवश्यक आहे

पूर्व चाचणी

३० दिवसांचा सेतू अभ्यास

       सेतू अभ्यास पूर्व चाचणी 

            वर्ग दुसरी ते दहावी


माध्यम निहायडाउनलोड
1.माध्यम मराठी                  Download
2.माध्यम Semi EnglishDownload
3.माध्यम उर्दुDownload
4.दिवस निहाय सेतू अभ्यासDownload
5.गुणदान तक्तेDownload
३० दिवसांचा सेतू अभ्यास


माध्यम निहायडाउनलोड
1.माध्यम मराठी                 Download
2.माध्यम EnglishDownload
3.माध्यम उर्दुDownload

शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रम राबविले त्यामुळे

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

Bridge Course 2022 - 2023

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप

१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांस सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. 

विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दिनांक ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल.

 तसेच उत्तर चाचणी दिनांक २३ जुलै / दिनांक ६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी

करावयाची कार्यवाही

1 ) पूर्व चाचणी

राज्यातील शाळा

 दिनांक १७ ते १८ जून, २०२२

विदर्भ भागातील शाळा

दिनांक ०१ ते ०२ जुलै, २०२२

✧═════•❁❀❁•═════✧

2) ३० दिवसांचा सेतू अभ्यास

राज्यातील शाळा

दिनांक २० जून ते २३ जुलै,२०२२

विदर्भ भागातील शाळा

दिनांक ०४ जुलै ते ६ ऑगस्ट, २०२२

✧═════•❁❀❁•═════✧

3) उत्तर चाचणी

राज्यातील शाळा

दिनांक २५ ते २६ जुलै, २०२२

विदर्भ भागातील शाळा

दिनांक ८ ते १० ऑगस्ट, २०२२

पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी 

१. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

४. सदर कृतीपत्रिका ( worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्या

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे.या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

८. शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दिनांक ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

ऑनलाईन उद्बोधन सत्र

 यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे.

 सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल.

उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. 

सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झालेनंतर शाळा भेटींच्या आधारे सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा

शासन परिपत्रक

शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा

वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शन

खालील लिंक वर क्लिक करा

प्रशिक्षण मार्गदर्शक व्हिडिओ 

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area