Complete For First To Twelve Syllabus

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून

पहिली ते बारावीसाठी संपूर्ण

अभ्यासक्रम लागू ! शिक्षण विभाग

मार्च २०२० पासून शाळा बंद पण शिक्षण सुरू असताना शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम २५% कमी करण्यात आला होता. 

शाळा बंद पण शिक्षण सुरू असताना कायम राहिल्याने सदर कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवण्यात आला होता.

परंतु सन 2022 - 2023 या शैक्षणिक वर्षाकरिता पाठ्यक्रम २५% कमी अभ्यासक्रम शासन निर्णय रद्द झाला आहे ( Maharashtra Board Exam )

शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..!!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

आता परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम वर होईल हे स्पष्ट झाले आहे

2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा दिनांक 15 जूनपासून ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत,

दिनांक तर विदर्भातील शाळा येत्या 27 जूनपासून सुरु होणार आहेत..

 याबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तसेच इतर माध्यमांद्वारे योग्य ती प्रसिध्दी द्यावी, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

अभ्यासक्रमात सूट नाही

शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिली ते बारावीसाठी 100 टक्के अभ्यासक्रम लागू असणार आहे. आता शिक्षकांना संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवावा लागेल संपूर्ण अभ्यासक्रम आधारित परीक्षा होईल हे चित्र स्पष्ट झाले आहे

वर्ग पहिली ते बारावी करिता अभ्यासक्रमात सूट मिळणार नाही संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करावे लागेल

शासनाने नुकतीच या निर्णयास मान्यता दिल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

नियमित रुपाने शाळा सुरु झाल्याने शालेय शिक्षण विभागाने नुकताच अभ्यासक्रम संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे

शासन परिपत्रक डाऊनलोड करा

सेतू अभ्यासक्रम

३० दिवसांचा सेतू अभ्यास

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad