State School Bell Will Ring On this Day Minister Of School Education

राज्यातील शाळेची शैक्षणिक वर्ष या

दिवशी सुरू होणार ! महाराष्ट्र राज्य

शालेय शिक्षणमंत्री

सदर शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत निर्देश निर्गमित केलेले आहेत

Maharashtra School

Digital BRC

शाळांचे सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष

सुरु करण्यासाठी सूचना

त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२२३ मध्ये दुसरा सोमवार दिनांक १३ जून २०२२ रोजी शाळा सुरु करण्यात येतील (New Academic Year)

 तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शाळा चौथा सोमवार दिनांक २७ जून २०२२ रोजी सुरु होतील.

अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे 

अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) दिनांक १३ जून २०२२ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड- १९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे.

 दिनांक १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

विदर्भातील शाळांबाबत 

विदर्भातील शाळांबाबत दिनांक २४ जून २०२२ ते २५ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड- १९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे.

दिनांक २७ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

२) शासनाकडून, आरोग्य विभागाकडून, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी निर्देश / सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आल्यास त्यांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

 ३) शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे / पालकांचे कोविड-१९ प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन / उद्बोधन करण्यात यावे

अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे

शासन परिपत्रक डाऊनलोड

निष्ठा उत्तर सूची

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad