Teacher Transfer Portal Complete Guidance

शिक्षक बदली पोर्टल संपूर्ण मार्गदर्शन


शिक्षक बदली प्रक्रियेसाठी मार्गदर्शक माहिती
Complete Guidance Of Teacher Transfer Portal

शिक्षकांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय.
ग्रामविकास विभागाचा आदेश

जेव्हा शिक्षक पहिल्यांदा लॉग इन करतात तेव्हा काय होते

पहिल्यांदा पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, शिक्षक प्रथम अस्वीकरण संदेश पाहू शकतो जो त्याला स्वीकारणे आवश्यक आहे. जेव्हा शिक्षक प्रोफाइल टॅबवर क्लिक करतो, तेव्हा शिक्षकाला महत्त्वाच्या नोट्स दिसू शकतात ज्या शिक्षकाने स्वीकारल्या पाहिजेत.

आपली प्रोफाइल अपडेट करणे

आपल्या मोबाईल वरुन आपले प्रोफाइल अपडेट करा
प्रोफाइल अपडेट वेळापत्रक

दिनांक 13 जून 2022 ते दिनांक 20 जून 2022 पर्यंत प्रोफाइल अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध राहील

शिक्षकाला त्याचा/तिचा प्रोफाइल डेटा कुठे मिळेल ?
Step
  • प्रथम खालील लिंक वर क्लिक करा 
  • बदली पोर्टल
  • आपला मोबाईल नंबर टाईप करा
  • Send OTP ऑप्शन वर क्लिक करा
  • आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी आला असेल तो टाकून लॉगिन करा
  • याठिकाणी लक्षात घ्या की योग्य ओटीपी टाकल्यावर खाली कॅप्चा म्हणजे इंग्रजी अक्षरे व अंक दिलेले असतात ते बॉक्समध्ये योग्य रितीने लहान मोठी अक्षरे व्यवस्थित बघून टाईप करून घ्या. अक्षरे चुकले तरीही प्रॉब्लेम होतो म्हणून काळजीपूर्वक टाईप करावे. सर्व व्यवस्थित झाले तरच खालील लॉगिन बटन "निळ्या रंगाचे" होते. आता त्या निळ्या रंगाच्या बटनावर टच केले की आपले लॉगिन सक्सेसफुली झाल्याचे पाहायला मिळेल.
  • Successfully Login केल्यावर ओपन होणाऱ्या पेजवर आपण इंग्रजी भाषा निवडलेली असेल तर CURRENT STAGE:TEACHER DATA UPDATE असे मोठ्या अक्षरात दिसेल. आणि जर मराठी भाषा निवडलेली असेल तर "सध्याची स्थिती :शिक्षकाची माहिती अद्ययावत होत आहे" असे दिसून येईल.
  • आता पोर्टल वरील 3 डॉट वर क्लिक करा
  • आता मेनू बार मध्ये प्रोफाइल वर क्लिक करुन आपले प्रोफाइल अपडेट करा
  • आपली प्रोफाइल पहा Next करा
  • मोबाईलवरून ओपन केले असेल तर डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेघा दिसतात. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतील त्याचे स्पष्टीकरण आपल्याला नंतरच्या पोस्टमध्ये देणार आहोत. त्यापैकी आपल्याला सध्या Profile (प्रोफाईल) वर टच करायचे आहे. Profile मध्ये दोन भाग आहेत.1.Personal details व 2. Employment details.प्रोफाईलवर टच केल्यावर आपल्याला सर्वप्रथम Personal Details (वैयक्तिक माहिती) हे पेज दिसते. यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही आणि गरजही नाही कारण ही माहिती बरोबर असल्याची खात्री आपण अगोदरच केलेली आहे.
'आता खाली उजव्या कोपऱ्यात NEXT (पुढे जा) बटनावर  टच करायचे आहे. त्यावर टच केल्यावर आपल्याला Employment Details (नोकरीची माहिती) हे आपल्या प्रोफाईलचे दुसरे पेज दिसत आहे. आपल्याला याच पेजवर काम करायचे आहे हे लक्षात असू द्या. आता खाली दिसत असणाऱ्या एक एक मुद्द्यांची माहिती कशी भरावी किंवा अपडेट करावी ते आपण बघूया.
  •  क्रमांक 1. Date of Appointment in Zp - ही तारीख All ready तिथे आहे पण ती तारीख नेमकी कोणती याची माहिती पुढीलप्रमाणे - ही तारीख म्हणजेच आपला सलगसेवा दिनांक आहे हे लक्षात घ्या. यामध्ये शिक्षकांनी आपण जिल्हा परिषदेच्या सेवेत ज्या तारखेला हजर झालो आहे ती तारीख बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. (आंतरजिल्हा बदलीने सध्याच्या जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी आपली पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या सेवेत हजर झालेली तारीख आहे की नाही याची खात्री करावी.) ही तारीख बरोबर असेल तर त्यामुद्द्यावर काहीही काम करायची गरज नाही. पण जर ही तारीख योग्य नसेल (चुकलेली असेल) तर या मुद्द्याच्या समोर दिसणाऱ्या ✅ टिकमार्कवर | टच करा. टच केल्यावर त्याखाली स्वतंत्र नवीन बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये टच केले की आपल्याला कॅलेंडर ओपन होईल त्यामध्ये वर महिना आणि वर्ष दिसेल त्यावर टच करा व त्यामधून योग्य ते वर्ष, महिना व तारीख निवडा. इथे आपले या मुद्द्याचे काम पूर्ण झाले. 
  • मुद्दा क्रमांक 2. Cast category (जात प्रवर्ग) - हा पण
तिथे उपलब्ध आहे. जर बरोबर नसेल तर समोरच्या वर ✅ टच करा. खाली नवीन बॉक्स बदल करण्यासाठी येईल. त्यामध्ये सुधारित जात प्रवर्ग शेवटी दिसणाऱ्या बाणावर टच करून निवडा. (Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.)

●  मुद्दा क्रमांक 3. Appointment category (नियुक्ती प्रवर्ग) तिथे आहेच. तो जर योग्य नसेल तर समोरच्या ✅ वर टच करा. खाली नवीन बॉक्समध्ये शेवटी - ड्रॉप डाउन लिस्ट मधून योग्य तो प्रवर्ग सिलेक्ट करावा.' 
●मुद्दा क्रमांक 4. Current district joining date (सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यात रूजू झाल्याची तारीख) - ही पण तारीख तिथे आहे. तिचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे - आपण सध्याच्या जिल्ह्यात ज्या तारखेला सेवेत हजर झालो आहे ती तारीख आहे की नाही याची खात्री करावी. (आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी सध्याच्या जिल्ह्यात हजर झाल्याची तारीख टाकावी.) जर तारखेचा बदल असेल तर मुद्दा क्रमांक एक प्रमाणे तारीख बदलण्याची कार्यवाही करावी. 

● मुद्दा क्रमांक 5. Udise code of current School (सध्या कार्यरत असणाऱ्या शाळेचा युडायस नंबर) - -
 शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बदल असल्यास ✅ टच करून समोरच्या करावा. 

● मुद्दा क्रमांक 6. Current School joining date(सध्याच्या शाळेतील हजर तारीख ) -
 ही तारीख मात्र तिथे दिसणार नाही ती आपल्याला भरायची आहे. त्यासाठी या मुद्द्याच्या समोर दिसणाऱ्या ✅ टिकमार्कवर टच करा. टच केल्यावर त्याखाली स्वतंत्र नवीन बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये टच केले की आपल्याला कॅलेंडर ओपन होईल त्यामध्ये वर महिना आणि वर्ष दिसेल त्यावर टच करा व त्यामधून योग्य ते वर्ष, महिना व तारीख निवडा.

Last Transfer Category:


1) Cadre 1 - संवर्ग 1 मधुन 
2) Cadre 2 - संवर्ग 2 मधुन

3) Entitled- संवर्ग -3 बदली अधिकार प्राप्त अवघड क्षेत्रातून

4) Eligible - संवर्ग 4 बदलीपात्र, टँडम विस्थापित मधुन

5) Other समायोजन, प्रमोशन, कोर्ट मॅटर मुळे बदली, येणकेण प्रकारे बदली * ( हे ऑप्शन सायंकाळपर्यंत पोर्टलला येणार आहे)

6 ) NA - प्रथम नेमणुक दिनांकापासुन पासुन याच शाळेत आहेत. लागू नाही

● Have You Work Continuously In Non Difficult Area (मागील 10 वर्षात तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रात सलग काम केले आहे?) जर तुमची एकूण सेवा 10 वर्षापेक्षा जास्त आणि सध्याच्या शाळेत 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली असेल अशाच शिक्षकांना हा मुद्दा भरण्यासाठी ओपन होईल हे लक्षात असू द्या. सध्याच्या शाळेत 5 वर्षापेक्षा कमी सेवा असणाऱ्यांना हा मुद्दा ओपन होणार नाही. यामध्ये Yes / No यापैकी तुम्हाला लागू होईल तो मुद्दा निवडा. 

सर्व माहिती भरून झाल्यावर खालील डाव्या कोपऱ्यात Save बटणावर टच करा. जर सर्व रकाने भरले गेले याची खात्री झाल्यावर खालील उजव्या कोपऱ्यातील Next (पुढे जा) बटनावर टच करा. आता आपल्याला Profile Preview (प्रोफाईल पूर्वावलोकन) दिसेल. त्यामध्ये आपण बदल केलेला सर्व डाटा दिसेल तो काळजीपूर्वक तपासा. सोबतच वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात खालील दिशेला टोक असलेला बाण दिसेल त्यावर टच केले की आपल्याला आपण भरलेल्या माहितीची pdf डाऊनलोड होईल. तिची प्रिंट काढून पण खात्री करता येईल. डाटा योग्य भरल्याची खात्री केल्यावर आता खाली Submit बटन आहे त्यावर टच करा. आता तुमची माहिती Verify करण्यासाठी BEO Login ला गेली आहे. याठिकाणी प्रोफाईल अपडेटचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे

BEO नी प्रोफाईल Verify केल्यावर ते पुन्हा शिक्षकांकडे Accept करण्यासाठी पाठवतील. 
शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यावर प्रोफाईल अपडेटचे काम पूर्ण होईल 

शिक्षकाने TT पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, डाव्या मेनूमधून प्रोफाइलवर क्लिक केल्यावर तो त्याचे प्रोफाइल पाहू शकतो आणि ते संपादित करू शकतो


शिक्षकाची प्रोफाइल मधील माहिती बरोबर किंवा पूर्ण नसल्यास अपडेट कशी करावी ?

शिक्षकाने TT पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, शिक्षक डाव्या मेनूमधून प्रोफाइलवर क्लिक करू शकतात, ते अपडेट करू शकतात आणि मंजुरीसाठी तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात.

शिक्षकांच्या प्रोफाइलचे स्वरूप काय आहे ?

शिक्षकाचे प्रोफाइल 2 पृष्ठांमध्ये विभागलेले आहे (फॉर्म):

1. कर्मचार्‍यांचे तपशील - शिक्षकाची वैयक्तिक माहिती (ही माहिती बदलता येणार नाही)

2.नोकरी तपशील - शिक्षकांचे नोकरी-संबंधित तपशील (शिक्षक या फील्डमध्ये बदल करू शकतात)

शिक्षक शिक्षकाच्या प्रोफाइलमध्ये शिक्षण अधिकाऱ्याने ने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास काय करावे?

गट शिक्षण अधिकाऱ्याने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास शिक्षक शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात.

शिक्षक त्याचे प्रोफाइल किती वेळा बदलू शकतात?

गट शिक्षण अधिकाऱ्याला प्रोफाइल पाठवण्यापूर्वी शिक्षक फक्त एकदाच फील्ड बदलू शकतात. त्यानंतर, शिक्षक फक्त अपीलसाठी शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात, परंतु त्यानंतर प्रोफाइल बदलू शकत नाहीत.

शिक्षण अधिकाऱ्याने प्रोफाइल बदलल्यानंतर शिक्षक त्यांचे प्रोफाइल बदलू शकतात का?
नाही.

प्रोफाईल केवळ शिक्षण अधिकाऱ्याच्या पुनरावलोकनानंतर केवळ 'वाचनीय' मोडमध्ये उपलब्ध आहे.
सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सदर प्रणालीचे अनावरण गुरुवार, दि. ०९ जून, २०२२ रोजी मा. मंत्री (ग्रामविकास) महोदयांच्या हस्ते करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार असून त्यासाठी सूचना देण्यात येत आहेत

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसित करण्यात आलेली संगणकीय प्रणाली www.ott.mahardd.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर संकेतस्थळाबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्व शिक्षकांना अवगत करावे व सदर संकेतस्थळास दररोज भेट देऊन संकेतस्थाळावर कार्यवाहीची मर्यादादेखील कटाक्षाने पाळण्याच्या सूचना द्याव्यात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad