Scholarship Exam Centers School One Holidays

इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुट्टी जाहीर ! शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ ही बुधवार दिनांक २० जुलै, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इ. ५ वीच्या ३३५३ व इ. ८ वीच्या २३५४ अशा एकूण ५७०७ परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे
Scholarship Examination

 सदर परीक्षेकरीता आपणामार्फत निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांच्या याद्या आपल्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे (Scholarship Examination)

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी)
 दिनांक २० जुलै, २०२२ च्या परीक्षा केंद्रांतील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

 शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या जिल्ह्यातील / तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेकरीता परीक्षा केंद्र असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना दिनांक २०/०७/२०२२ रोजी एक दिवसाची सुट्टी देण्यात यावी असे परिपत्रक शिक्षण विभागाने निर्गमित करण्यात आले आहे

त्या दिवशीचा अभ्यासक्रम इतर सुट्टीच्या दिवशी शाळा भरवून पूर्ण करून घेण्यात यावा, तथापि सदर दिवशी शाळेचे कार्यालयीन कामकाज सुरू राहील याची नोंद घ्यावी. 
याअनुषंगाने संबंधित शाळांना आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सुचना तात्काळ निर्गमित कराव्यात. 

परीक्षा घेण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे


शिक्षण संचालक
महाराष्ट्र राज्य पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area