STARS प्रकल्प अंतर्गत
संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण
PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर
नोंदणी ! संपूर्ण माहिती
PAT Maharashtra 2024
वरील विषयान्वये STARS
प्रकाल्पामधील SIG २ limproved Learning Assessment - System नुसार सन २०२४ - २०२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववी विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे.
उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात आलेली आहे
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे.
मुदतवाढ
राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी (PAT-2) चे गुण दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 05 डिसेंबर 2024 पर्यंतचा PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे.
➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध
संकलित मूल्यमापन चाचणी चे गुण आँनलाईन भरावे
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
ॲप डाऊनलोड झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण भरण्याकरिता
➤ खालील लिंक वर क्लिक करा
चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा.
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ शिक्षक प्रशिक्षण
सदर Swift Chat चाटबॉटवर चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना खालील व्हिडिओ वर केले आहे
यु-ट्यूब लिंक :-
PAT चॅटबॉट मार्गदर्शिका:
कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ./माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर मूल्यमापन चाचणी PAT-2 चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये मूल्यमापन चाचणी PAT-2 घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
What's Up Group Join
iPhone साठी app link share करा
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना