Inter District Transfer Process Complete

राज्यातल्या शिक्षकांसाठी महत्त्वाची

बातमी!  हजारो शिक्षकांची बदली

शिक्षक आंतरजिल्हा बदली  प्रक्रिया पूर्ण ; सोमवारी बदली आदेश...!

ऑनलाइन बदली अभ्यास गट समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आयुष प्रसाद साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण

३१ तासात ३९४३ शिक्षकांच्या बदल्या.

जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अखेर ३१ तासानंतर पूर्ण झाली असून एकूण ३९४३ शिक्षकांची बदली या प्रक्रियेत झाली आहे.OTT सॉफ्टवेअर द्वारे शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे.या प्रक्रियेत ४८ संगणक असलेली ही यंत्रणा १४ फेऱ्यांमध्ये ३१ तास चालली.४८ तज्ञ या प्रक्रियेत सहभागी होते.

जिल्हा निहाय बदली शिक्षकांची यादी जाहीर

आंतर जिल्हा बदली


इयत्ताडाउनलोड
1.अहमदनगरDownload
2.वाशिमDownload
3.साताराDownload
4.रायगडDownload
5.  बीडDownload
6.गडचिरोलीDownload
7औरंगाबादDownload
8
9
10
11
12
पुणे
धुळे
अमरावती
सांगली
गोंदिया
Download
Download
Download
Download
Download

आंतर जिल्हा बदली


इयत्ताडाउनलोड
1.एकुण बदली   Download
2.वर्धाDownload
3.भंडाराDownload
4.हिंगोलीDownload
5.  नांदेडDownload
6.नंदुरबारDownload
7परभणीDownload
8
9
10
11
12
13
14
15
कोल्हापूर
यवतमाळ
सोलापूर
जालना
बुलढाणा
सिंधुदुर्ग
पालघर
उस्मानाबाद
Download
Download
Download
Download
Download
Download
Download
Download

दि.१९ रोजी रात्री १२ वा.बदली प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली.आज दि.२१ रोजी सकाळी ७ वा.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली .राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या उपलब्ध रिक्त पदांवर तसेच ज्या ठिकाणी रिक्त पद उपलब्ध नाही अश्या व आहेत अश्या दोन्ही जिल्ह्यात साखळी पद्धतीने देखील बदल्या या प्रक्रियेत करण्यात आल्या आहेत.बदलीचा संपूर्ण डाटा ENCRYPT ( एका विशिष्ट गोपनीय कोड मध्ये रुपांतरीत ) करण्यात आला आहे.उद्या दि.२२ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश ग्रामविकास मंत्री मा.ना. गिरीष महाजन यांचे हस्ते प्रकाशित केले जाणार आहे. तदनंतर बदली झालेल्या शिक्षकांना पोर्टल वर बदली आदेश उपलब्ध केले जाणार आहे.याबाबत मेल द्वारे संबंधित शिक्षकाला माहिती उपलब्ध होणार आहे.

आंतरजिल्हा बदली ची प्रक्रिया पुर्ण झाली असून जिल्हा नुसार संबंधित जिल्ह्यातून बाहेर पडणारे शिक्षकांची संख्या जाहीर करण्यात आली आहे.या प्रक्रियेत NOC -१ , कॅडर १ - ५७५ , कॅडर २- ५३८ व सर्वसाधारण - २८२९ शिक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे.बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्त प्रक्रिया लवकरच होणार असून या संबंधीचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात येणार आहे.संघटनेच्या वतीने यापूर्वी देण्यात आलेल्या माहिती नुसार बदली प्रक्रिया मुदतीत पूर्ण झाली

शयापूर्वी चार टप्प्यात १०८०० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या होत्या .या प्रक्रियेत ३९४३ बदल्या पूर्ण झाल्या असून एकूण १५ हजार जवळ आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रक्रियेने आज रोजी पर्यंत पूर्ण झाल्या आहेत

राज्यात एकूण २३ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रतीक्षेत होते ,पैकी १५ हजार पूर्ण झाल्या असून उर्वरित ८ हजार शिक्षक अजूनही बदली प्रतीक्षेत आहेत हे उल्लेखनीय

आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षक बांधवांना हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad