NMMS Exam Scholarship Merit List

NMMS Exam शिष्यवृत्ती परीक्षेची

निवड यादी जाहीर! जिल्हा निहाय

यादी डाऊनलोड करा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दिनांक १९/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची निवडयादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दिनांक २९/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.NMMS परीक्षा 2021-22 चा जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी लॉगीनवर देण्यात आलेला आहे

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा

NMMS Exam 2022 गुणवत्ता यादी जाहीर

शाळा, जिल्हा व प्रवर्ग निहाय यादी डाउनलोड करा.

खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा

                निवड यादी

१) NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११,६८२ शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे.
२) महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठीचे ४% आरक्षण समाविष्ट आहे.
३) सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ. ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.
४) पात्रता गुण : MAT व SAT दोन्ही विषयात एकत्रित GEN , VJ , NTB , NTC , NTD , OBC , SBC , EWS साठी ४०% गुण व SC , ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२% गुण मिळणे आवश्यक आहेत.
५) प्रत्येक जिल्ह्यासाठीचा कोटा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.
    १. प्रथम गुणानुक्रमे सर्वसाधारण संवर्गातील (General) पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
   २. त्यानंतर उर्वरित ९ मागासवर्गीय संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad