निपूण भारत अभियान (FLN)
माता पालक गट विभागानुसार
नोंदणी लिंक
सर्व शाळा स्तरावरील इयत्ता १ली ते ३री च्या मातांचे गट करून प्रत्येक गटाला प्रमुख माता निवडून शाळेच्या मुख्याध्यापकांनी माता गटाची माहिती लिंकवर भरावी
१) प्रत्येक शाळेने गाव / मोहल्ला / वस्ती निहाय इयत्ता १ ते ३री च्या विदयार्थ्यांच्या माता-पालक गटाची बांधणी करावी.
२) प्रत्येक गटामध्ये ५ ते ६ माता असाव्यात.
३) प्रत्येक गटासाठी लिडर माता निवडावी.
४) सर्व मातांचा WhatsApp Group तयार करावा
५) शिक्षकांनी गावातील सर्व माता पालक गटांची माहिती आपापल्या विभागानुसार पुरवण्यात आलेल्या लिंकवर
६) या WhatsApp Group वर दर आठवडयाला शिक्षकांनी आयडीया / व्हीडीओ पाठवावे.
७) लिडर माता गटातील इतर मातांना त्यांच्या सवडीनुसार आठवडयातून एकदा भेटतील व दिलेल्या आयडीया / व्हीडीओ कृती समजुन देतील. तसेच या सभेत काही मुलांसोबत कृतींचे प्रात्यक्षिक करून घेतले जाईल.
८) माता-पालक या सर्व कृती त्या आठवड्यात मुलांसोबत घरी करून घेतील.
९) माता-पालक गटांना येणाऱ्या अडचणींचे WhatsApp च्या माध्यमातुन शिक्षकांमार्फत निरसन करण्यात यावे.
१०) शाळेच्या सवडीनुसार दरमहा सर्व मातांची आढावा बैठक शाळेत घेण्यात यावी.
११) या उपक्रमांचे फोटो व अॅक्टीव्हीटी शिक्षकांनी स्वत:कडे संग्रहीत (सेव्ह) करून ठेवाव्या. तसेच हे फोटो व व्हिडीओ राज्यस्तरीय लिंकवर अपलोड करावे. (सदर लिंक WhatsApp च्या माध्यमातुन आपणास लवकरच पाठविण्यात येईल.)
विभाग निहाय नोंदणी लिंक
अनु. | विभाग | नोंदणी लिंक |
1. | नाशिक | |
2. | अमरावती | |
3. | कोल्हापूर | |
4. | औरंगाबाद | |
5. | लातूर | |
6. | मुंबई | |
7. | पुणे | |
8. | नागपूर | |
9. | नोंदणी लिंक |

आपली प्रतिक्रिया व सूचना