Students Homework Stop Provide New Active Education

पालकांसाठी मोठी बातमी ! 

विद्यार्थ्यांचा गृहपाठ होणार बंद ! 

शालेय शिक्षण मंत्री

 विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खुप महत्वाची आहे - शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार गृहपाठ आता बंद होणार आहे - असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले 

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ घेणं हे पालकांसाठी खूप अवघड असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गृहपाठाविषयी लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. 

 पहा आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री ?

● दीपक केसरकर म्हणाले कि, गृहपाठ बंद झाल्यास पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ताण हलका होऊ शकतो. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार आम्ही करत आहो  

● मात्र गृहपाठाविषयी आम्ही शिक्षक संघटना, संस्था चालकांशी बोलून यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहोत, 

● दरम्यान, गृहपाठ नसेल तर विद्यार्थी घरी अभ्यास करतील का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे या निर्णयावर तज्ञ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

कृतीयुक्त शिक्षण

व्यवसायाभिमुख, कौशल्याधिष्ठित, तांत्रिक पायाभूत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे शिक्षण देण्यावर भर द्यावा. शैक्षणिक प्रक्रीयेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण विभागाने सतत प्रयत्नशील रहावे. शिक्षकांनी संशोधनाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण द्यावे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर द्यावा, असेही अध्यापन पद्धतीत बदल करावे,  त्यासाठी नवनवीन कृतीयुक्त शिक्षण द्यावे.

माननीय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad