सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक जाहीर
संदर्भ : १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिप - ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था.१४, दिनांक ०७.०४.२०२१.
२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब- ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था. १४, दिनांक ०४.०५.२०२२.
३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब- २०२२/प्र.क्र.२९/आस्था.१४, दिनांक २९.०६.२०२२.
दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 रोजी ची शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात नवीन शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र. ४ नुसार निर्गमीत करण्यात आले होते.
परंतु, दरम्यानच्या कालावधीत दिपावली सण तसेच क्षेत्रिय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी काही अधिकचा वेळ लागणार असल्यामुळे उपरोक्त संदर्भ क्र. ४ येथील
दिनांक २०.१०.२०२२ चे पत्र रद्द करण्यात येत असून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे..
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे
सुधारित धोरण संदर्भ क्र. १
येथील दिनांक ०७.०४.२०२१
च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.
सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र.२ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे.
तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील
दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.
राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सदर वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात यावी.
दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२२ पासून सुरु होणार
तसेच सदरची बाब आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून त्याबाबत संबंधित शिक्षकांकडून पोहोच घ्यावी व आपल्या अभिलेखामध्ये जतन करुन ठेवावी
जि प शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक 2022(शासन परिपत्रकनुसार)
विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे.
दिनांक 5/11/2022 ते 7/11/2022.
विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे-
दिनांक 24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)
विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे-
दिनांक 01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे-
दिनांक 08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)
बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे-
दिनांक 15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)
विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे.
दिनांक 22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)
अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे.
दिनांक 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)
बदलीचे आदेश प्रकाशित करणे.
दिनांक 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस


आपली प्रतिक्रिया व सूचना