ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी
प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रिया बाबत
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
दुरुस्ती प्रक्रिया
Senior and Selection Category Training
Regarding the repair process
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी अनुक्रमे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दिनांक ०१ जून २०२२ पासून ऑनलाईन स्वरुपात व्यवस्थित सुरु आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्ष्णार्थ्यांनी केलेल्या नावनोंदणीतील त्रुटी दुरुस्तीसाठी दिनांक २२ जून २०२२ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. सदर मुदतीत ज्या प्रशिक्ष्णार्थ्यांनी दुरुस्ती नोंदणी केली होती त्यांचे प्रशिक्षण व्यवस्थित सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यातील एकूण ९४,५४१ शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यानुसार आजतागायत एकूण ८८,५३९ प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करून घेतले आहे.
उर्वरित प्रशिक्षणार्थी हे आपले प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत.
एकंदरीत मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याने दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा खुली केल्यामुळे प्रशिक्षण यंत्रणेवर ताण येवू नये यासाठी दिनांक २२ जून २०२२ नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली नाही.
परंतु अद्यापही काही प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण अपूर्ण असल्याने व जवळपास ८८,५३९ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांची माहिती दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा खुली करण्यात येत आहे.
सद्यस्थितीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत
तसेच संदर्भ क्रमांक ५ अन्वये च्या पत्रानुसार यापूर्वी देखील प्रशिक्षणार्थी यांना आवश्यक दुरुस्ती ची सुविधा या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
तथापि अद्यापही काही प्रशिक्षणार्थी यांच्याकडून झालेल्या तांत्रिक चुकांमुळे (चुकीचा ई-मेल आय.डी नोंदणी, चुकीचा प्रशिक्षण प्रकार
• अथवा प्रशिक्षण गट नोंदणी करणे, लॉगीन तपशील प्राप्त होण्यापूर्वीच प्रशिक्षण सुरु करणे,
एकाच ई-मेल आय.डी वरून दोन प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे) इत्यादीमुळे संबंधित प्रशिक्षणार्थी यांना काही दुरुस्ती करावयाची असल्याने संबंधित प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training.scertmaha.ac.in/
संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदरच्या दुरुस्तीच्या सुविधेमार्फत खालील दुरुस्ती प्रशिक्षणार्थी करू शकणार आहेत.
• प्रशिक्षणाचे लॉगीन उपलब्ध झालेले नसणे.
• प्रशिक्षण गट तसेच प्रशिक्षण प्रकार यामध्ये बदल करावयाचा असणे
• ई-मेल आय. डी. दुरुस्ती करणे
प्रशिक्षण प्रमाणपत्र दुरुस्ती करणे.
सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी,
ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण सुरळीतपपणे सुरु आहे अशा प्रशिक्षणार्थी यांनी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा बदल करू नये.
तसेच आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबतचे देखील संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.
उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०,२०२२ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही याबाबत संबंधित प्रशिक्षणार्थी यांना अवगत करावे.
तरी वरीलप्रमाणेच्या प्रशिक्षण दुरुस्ती सुविधेबाबत आपल्या कार्यक्षेत्रामधील प्रशिक्षणार्थी यांना अवगत करण्यात यावे
यासाठी प्रशिक्ष्णार्थ्यांचे खालील ०४ गट करण्यात येत आहे,
१. प्रशिक्षण पूर्ण केलेले व प्रमाणपत्र डाऊनलोड केलेले प्रशिक्षणार्थी
२. प्रशिक्षण पूर्ण केलेले व प्रमाणपत्र अद्याप प्राप्त न झालेले प्रशिक्षणार्थी
३. प्रशिक्षणास लॉगिन केलेले पण प्रशिक्षण पूर्ण न केलेले प्रशिक्षणार्थी
४. प्रशिक्षणास अद्याप लॉगिन च न केलेले प्रशिक्षणार्थी
| अ. क्र. | विषय तपशील | कार्यवाहीचा दिनांक |
|---|---|---|
| १. | प्रशिक्षणार्थी माहिती दुरुस्ती प्रक्रिया | २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ |
| २. | प्राप्त माहितीनुसार आवश्यक पडताळणी प्रक्रिया | ०१.११.२०२२ ते ०३.११.२०२२ |
| ३. | अंतिम माहिती इन्फोसिस प्रशिक्षण प्रणालीस सादर करणे व प्रणालीवर अद्ययावत करणे. | ०४.११.२०२२ ते १०.११.२०२२ |
| ४. | प्रशिक्षणार्थी यांचे दुरुस्तीनुसारचे प्रशिक्षण सुरु | १२.११.२०२२ पासून |
खालील लिंक वर क्लिक करा
नोंदणी क्र.
दुरुस्ती प्रक्रिया
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र


प्रशिक्षणासाठी नवीन नाव नोंदणी केव्हा सुरुवात होणार आहे
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना