NMMS Scholarship Exam All Information

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा

संपूर्ण माहिती व निकष !

जाणून घ्या

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२- २०२३

 परीक्षेचे वेळापत्रक :-

 महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत सन २०२२ - २३ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी

 दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार होती,

 तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर

परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

1) बौध्दिक क्षमता चाचणी Mental Abilily Test (MAT)

एकूण गुण 90

एकूण प्रश्न 90


 2) शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test (SAT)

एकूण गुण 90

एकूण प्रश्न 90

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

 परीक्षेसाठी विषय : 

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

 (a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) : ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव,

विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

 (b) शालेय क्षमता चाचणी (SAT)  ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल.

 त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण ३५) ३. गणित ( एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण १० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल

a. सामान्य विज्ञान ३५ गुण भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण. 

माध्यम :- 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. 

(सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) 

विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.

विद्यार्थ्याकरिता सूचना

 दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. 

प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. 

योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.

 पेन्सिलचा वापर केलेली / अपुरी / अशंत रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. 

एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे व्हाइटनर खाडाखोड करन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत

आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :- 

अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे.

 महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. 

कोठयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. 

दिव्यांगासाठी ( अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षणअसेल. 

 जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्याच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात येतील.

निकाल घोषित करणे

 सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या : आठवडयात जाहीर करण्यात येईल.

 सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. 

जिल्हयांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

 शिष्यवृत्ती दर:- 

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी दरमहा रु. १,०००/- ( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

 शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वीतून इ. १० वी व इ. ११ वीतून इ. १२ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.

इ.१० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. ( SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.) 

सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक

(माध्य व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad