NMMS Scholarship Exam Online Application Start

NMMS परीक्षा 2022-23

आवेदन पत्र भरण्यास सुरु

! NMMS Exam 2022 - 2023

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२- २०२३

NMMS Scholarship Exam
      2022 - 2023 


सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्याथ्र्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्याथ्र्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.


१) अर्ज करण्याची पध्दत :- 


दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
https://www.mscepune.in/व
 https://nmmsmsce.in

या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

शाळेचे नोंदणी

खालील लिंक वर क्लिक करा


शाळेची Login

खालील लिंक वर क्लिक करा

             शाळेची Login

२) पात्रता :

 (a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या
परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे ( आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा.

 सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
विद्यार्थी/विद्याथ्र्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. 
(अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

(d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत.

विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी 

केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.

सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

३. विद्याथ्यांची निवड :

 विद्यार्थ्याची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. 

संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

४. परीक्षेचे वेळापत्रक :-

 महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक सन २०२२ - २३ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार होती, तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

आवेदन वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

शुल्क :- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

१)ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे

दिनांक १०/१०/२०२२ ते ३१/१०/२०२२

शुल्क रु १२०/


२) ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे

दिनांक ०१/११/२०२२ ते ०५/११/२०२२

शुल्क रु  २४०/


3) ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे

दिनांक ०६/११/२०२२ ते १०/११/२०२२

शुल्क रु ३६०/

 (शाळा / संस्था जबाबदार असेल तर)

(४८०/-)


 शाळा संलग्नता फी

संलग्लता फी रु. २००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी असेल

असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे


NMMS शिष्यवृत्ती परीक्षा

संपूर्ण माहिती व निकष !


NMMS  Exam प्रश्नपत्रिका

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad