Big News State Government Changes Teacher Recruitment Rules

राज्य सरकारची मोठी घोषणा !

शिक्षक भरतीच्या नियमांत बदल|

 जाणून घ्या सविस्तर

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती करताना सर्वांना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीत नवीन सुधारणा केल्या आहेत.

राज्यात शिक्षकांची भरती करण्यासाठी सरकारने ‘पवित्र’ पोर्टल सुरु केले असून शिक्षक भरती करण्यासाठी पोर्टल मध्ये काही बदल करण्यात आले , 

तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत गुण सुधारण्यासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त पाच वेळा संधी दिली जात होती,आता त्यात नवीन नियमांची भर पडली. 

पाहूया काय आहेत शिक्षक भरतीचे नवीन नियम !

▪️ आता उमेदवाराला प्रत्येक वेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागेल.

▪️ आधीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

▪️ शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेतले जाईल.

▪️ 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल केले आहे. 

▪️ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठी उमेदवाराने किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे, चाचणीसाठी उमेदवारांनी निवडलेले माध्यम केवळ त्या चाचणीसाठीच असेल. 

▪️ चाचणीनंतर भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती देण्यात येतील,पात्र उमेदवारांसाठी एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांना व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

▪️ उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर, उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र असेल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad