Ads Area

Scholarship Exam Online Application Apply

इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३

करिता ऑनलाईन आवेदन अर्ज

भरण्यास सुरुवात ! Msce Pune

 शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ दिनांक दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार

उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. 

सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. 

तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता

 दिनांक २० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. २० डिसेंबर २०२२ रोजी पर्यंत भरावी

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) फेब्रुवारी - २०२३ च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत....


Scholarship Exam Maharashtra

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...

शासनमान्य शाळांमधून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी

 तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र 

दिनांक १६/११/२०२२ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे

शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे.

ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक

शुल्क प्रकार

1) नियमित शुल्कासह (With Regular Fee)

दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ ते २० डिसेंबर २०२२

2) विलंब शुल्कासह (With Late Fee)

दिनांक २१ डिसेंबर २०२२ ते २५ डिसेंबर २०२२

3) अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee)

दिनांक २६ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२


दिनांक ३१/१२/२०२२ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन | पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.

शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ करिता सुरुवातीला शाळेची नोंदणी करावी

खालील लिंक वर क्लिक करा

शिष्यवृत्ती परीक्षा करिता विद्यार्थ्यांचे आवेदन भरण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरा

खालील लिंक वर क्लिक करा


अ.

तपशील

 डाऊनलोड

1.

परीक्षा शुल्क

Download 

2.

अधिसूचना

Download 

3.


Download



शिष्यवृत्ती परीक्षा करिता शाळेची नोंदणी कशी करावी संपूर्ण मार्गदर्शन खाली दिलेले आहे


वर्ग पाचवी शिष्यवृत्ती शुल्क

शुल्काचा प्रकार इयत्ता 5 वी करिता

1) बिगरमागास विद्यार्थ्यांकरिता

➡️ प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 150 रुपये = एकूण शुल्क 200 रुपये

2) मागास/दिव्यांग. विद्यार्थ्यांकरिता करिता

➡️ प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 75 रुपये = एकूण शुल्क 125 रुपये

वर्ग आठवी शिष्यवृत्ती शुल्क

शुल्काचा प्रकार इयत्ता 8 करिता

1) बिगरमागास विद्यार्थ्यांकरिता

➡️ प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 150 रुपये = एकूण शुल्क 200 रुपये

2) मागास/दिव्यांग. विद्यार्थ्यांकरिता करिता

➡️ प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 75 रुपये = एकूण शुल्क 125 रुपये

शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- प्रति वर्ष

*(NTS / NMMS परीक्षेकरीता परीक्षा परिषद शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती संलग्नता शुल्क भरावे लागेल*

महत्वाच्या दिनांक

परीक्षा दिनांक – 12 फेब्रुवारी 2023

शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- 16/11/2022 ते दिनांक 20/12/2022

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :

1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे

2. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. 5 वी किंवा इ. 8 वी मध्ये शिकत असावा, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad