Educational News School Education Kerala Pattern Applied All Information

विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी

आता शालेय शिक्षणात लागू होणार

केरळ पॅटर्न ! पहा सविस्तर

 राज्यातील शिक्षण विभागात आता केरळ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. केरळ सोबत राजस्थान आणि पंजाब या राज्यातील शिक्षणातील पॅटर्न मधील यशस्वी प्रयोग सुद्धा राज्यात राबवले जाणार आहेत. 

To be applied in school education

 Kerala pattern 

Maharashtra Education

 राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभाग इतर राज्यातील यशस्वी प्रयोग राज्यातील शिक्षणात राबवण्याच्या तयारीत आहे यामुळे शालेय शिक्षणात अनेक मोठे बदल होणार आहेत 

पहा काय बदल होणार

 केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील

 ज्या राज्यांनी शिक्षणात प्रगती झाली आहे त्या राज्यातील पॅटर्न महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. 

त्यामध्ये केरळ पॅटर्नवर विशेष काम केलं जाईल. 

यासोबतच राजस्थान आणि पंजाब मधील मॉडेलचा देखील विचार यामध्ये केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.  

पहा कसा आहे केरळ पॅटर्न ?

▪️ केरळ पॅटर्नमध्ये प्राथमिक शाळा चालवण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना तर माध्यमिक शाळा चालवण्याच्या अधिकार जिल्हा परिषदेला आहेत. 

▪️ प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल. कमी गुण मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाते. 

▪️ दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदल केला जातो. 

▪️ प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक व पालकांचे असोसिएशन आहे. 

▪️ मातृभाषेतील शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे या केरळ पॅटर्न मधील महत्त्वाच्या बाबी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात लागू करू , असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad