All Teachers And Headmaster Telegram Group Channel

राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी सर्व

शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी

टेलिग्राम चॅनेल सुरू

SCERT Telegram Channel

राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना विविध योजना, धोरणे, परिपत्रके, प्रशिक्षणे, स्पर्धा, सर्वेक्षण व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ उपलब्ध होणेबाबत तयार करण्यात आलेल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होणेबाबत 

आपणास विदित आहेच की, शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांसाठी शिक्षकांसाठी विविध योजना याचसोबत शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन, विविध राष्ट्रीय, राज्य स्तरीय शैक्षणिक सर्वेक्षणे (उदा. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण इत्यादी) विविध शैक्षणिक योजना, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय, राज्य स्तरावरून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, विविध ऑनलाईन उपक्रम, विविध उपक्रमांच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजन, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावरील विविध स्पर्धा, उपक्रम, विविध शैक्षणिक कार्यक्रम व त्यांची वेळापत्रके इत्यादी अशा अनेक अनुषंगिक बाबींसाठी राज्यस्तरावरून विभागस्तरावर / जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर पत्र व्यवहार केला जातो.


राज्यस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने उपरोक्त बाबींची माहिती शाळास्तरावर अथवा शिक्षकांपर्यंत काहीवेळेस तत्काळ उपलब्ध होतेच असे नाही.

 आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राज्यस्तरावरील अशा स्वरुपाची महत्वाची शैक्षणिक माहिती, पत्रव्यवहार, तसेच शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीने घेण्यात येणारे उपक्रम यांची

माहिती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांना एकाच वेळी व तात्काळ उपलब्ध व्हावे यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत टेलीग्राम चॅनेल सुरु करण्यात येत आहे. 

सोबतच्या लिंक वर क्लिक करून अथवा QR कोड स्कॅन करून राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी चे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सदरच्या टेलीग्राम चॅनेल मध्ये सहभागी होऊ शकतात.

तरी आपल्या कार्यक्षेत्रामधील सर्व शिक्षकांना याबाबत अवगत करण्यात यावे. जेणेकरून राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यापर्यंत शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम अथवा माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.

टेलिग्राम चॅनेल लिंक:

       टेलिग्राम चॅनेल लिंक


याचसोबत परिषदेच्या इतर समाजमाध्यमांना देखील सर्व शिक्षकांनी जॉईन व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

फेसबुक : https://www.facebook.com/MahaSCERT


ट्विटर : https://twitter.com/scertmaha

युट्यूब:

 https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDH$BvZvVw

 

वरीलप्रमाणे फेसबुक, ट्विटर व युट्यूबच्या लिंक, टेलिग्राम वर क्लिक करून सर्व शिक्षकांना सदर राज्यातील शालेय शिक्षण विभागाची विविध धोरणे, निर्णय,  परिपत्रके, प्रशिक्षण, सर्वेक्षण, स्पर्धा व अनुषंगिक बाबी यांची माहिती एकाचवेळी व्हावी व त्यानुसार शाळास्तरावर आवश्यक कार्यवाही करणे सोयीस्कर व्हावे, 

यासाठी राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या  सर्व मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शिक्षक खालील लिंक ला क्लिक करून या चॅनेल ला जॉईन होऊ शकतात.

https://t.me/MhTeachers

( राजेश पाटील ) भा.प्र.से
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad