Samagra Shiksha Abhiyan PFMS System Guidelines

समग्र शिक्षा अभियान २०२२- २३

शाळांचे अनुदान आता

तालुकास्तरावरून खर्च होणार ! MPSP Pune

 

PFMS प्रणालीवर देण्यात आलेल्या लिमिटच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना

समग्र शिक्षाची खाती सद्यस्थितीत तालुका स्तरापर्यंत कार्यान्वित असल्याने जिल्हा परिषद, मनपा, तालुकास्तर व शाळा स्तरावरून राज्य कार्यालयास शाळा स्तरावरील अनुदानाचे वितरण कसे करावे याबाबत वारंवार विचारणा करण्यात येत होती. 

त्या अनुषंगाने समग्र शिक्षा योजने करिता मंजूर असलेल्या कार्यक्रमावरील खर्च तालुकास्तरावरून शाळास्तरांनी सन २०२२-२३ करिता पुढील प्रमाणे खर्च करण्याकरिता ची प्रक्रिया अवलंबविण्यात यावी.

१) यापूर्वीच ज्या पद्धतीने शाळा स्तरावरील संयुक्त शाळा अनुदान, गणवेश अनुदान व बांधकामावरील निधीचे वितरण करण्यापूर्वी जशी प्रक्रिया शाळास्तरावर करण्यात येत होती ती त्याच प्रकारे करण्यात यावी. केवळ शाळा स्तरावरील सर्व प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित मुख्याध्यापक यांनी सर्व देयके स्वाक्षरीसहित संबंधित तालुकास्तरावर सुपूर्त करून केवळ तालुक्यानी देयकांची अदायगी पीएफएमएस प्रणालीद्वारे करावी.

२) सद्यस्थितीत संबंधित तालुका / मनपा यांनी शाळानिहाय संयुक्त शाळा अनुदान, गणवेश अनुदान व बांधकामावरील निधीचे वितरण पीएएमएस प्रणालीवर करताना सद्यस्थितीत मॅन्युअल पद्धतीने प्रत्येक शाळेनिहाय डेटा आपल्या कार्यालयात ठेवावा. तसेच तालुका यांनी प्रत्येक शाळेला संयुक्त शाळा अनुदान, गणवेश अनुदान व

बांधकामावरील वितरण करताना मंजूर अनुदानापेक्षा अधिक व दुबार वितरण होणार नाही व मंजूर अनुदानापेक्षा जास्त अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता संबधित शाळा व तालुका / मनपा या दोघांनी घेण्यात यावी. ती जबाबदारी संबधित तालुकास्तरावरील व शाळा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांची असेल. त्या नुसार तालुका / मनपा यांनी पीएफएमएस प्रणालीवर प्रदानाची कार्यवाही करावी.

३) डायट अंतर्गत कार्यरत असलेले समग्र शिक्षा करीता चे कर्मचारी जिल्हा सक्षमीकरण समन्वयक (समावेशित शिक्षण) यांचे वेतन जिल्हास्तरावर व डायट अंतर्गत कार्यरत असलेले समग्र शिक्षा करीता चे कर्मचारी विषय साधनव्यक्ती (विषय तज्ञ), विषयतज्ञ (समावेशित शिक्षण) यांचे वेतन तालुकास्तरावर उपरोक्त कार्यालयीन आस्थापनाविषयक असलेल्या नियमांची तसेच वेळोवेळी शासन निर्णय यांची पालन करून उपस्थिती अहवाल / मंजूर दैनंदिनी प्राप्त करून संबंधित कर्मचारी यांचे वेतन जिल्हा स्तरावरून व तालुकास्तरावरून काढण्यात यावे.

४) प्रत्येक अनुदानाची अदायगी करताना जिल्हास्तर, मनपा, तालुकास्तर, एस सी आर टी , डाएट, केजीबीवी, रेसिडेन्शिअल हॉस्टेल, रेसिडेन्शिअल स्कूल, शाळा यांनी FMP मॅन्युअल मधील लागू असलेले नियम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयातर्फे दिलेल्या मार्गदर्शक सूचना व वेळोवेळी असलेल्या शासन निर्णय यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने सदरची कार्यवाही करण्यात यावी.

तरी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad