मोठी बातमी ! - शिक्षण सेवकांच्या
मासिक मानधनात होणार मोठी वाढ
राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला,
Increase in the monthly salary
त्यानुसार आता राज्यातील प्राथमिक शिक्षकांना १६ हजार रुपये आणि माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांना २० हजार मानधन करण्यात येणार आहे - राज्य सरकारने सांगितले आहे
काय सांगितले राज्य सरकारने
राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना तसेच शिक्षक सेवक यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जात होती, अखेर राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना पहिले तीन वर्ष शिक्षक सेवक मानधन दिले जात होते, त्यानंतर त्यांना कायम शिक्षक करून नियमानुसार वेतन दिले जाते.
तसेच पूर्वीच्या मानधनात २०११ ला वाढ झाली होती, त्यानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांना ६ हजार रुपये आणि माध्यमिक शिक्षकांना ८ हजार रुपये तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांना ९ हजार मानधन दिले जात होते.
राज्यातील शिक्षकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा


आपली प्रतिक्रिया व सूचना