निपुण भारत अभियान २०२२ - २३
अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
श्रेणी व नोंद पत्रक ! डाऊनलोड करा
निपुण भारत अभियान अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण इयत्ता दुसरी ते पाचवी विद्यार्थ्याकरिता करायचे आहे
विद्यार्थ्याचे अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे
सर्व श्रेणीचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे दिले आहे
A ) O या रकान्यात केव्हा टीक करावी?
उदाहरणार्थ अ नावाचा विद्यार्थी Los No १ मध्ये जर प्रारंभिक (Below Basic/ Beginners) स्तरावर असेल तर त्याच्या नावापुढे ० या रकान्यामध्ये टीक करावी. या विद्यार्थ्यास ज्ञान व कौशल्य प्राप्त नाहीत. अभ्यासात अगदी प्रारंभिक अवस्थेत असून कोणत्याही अध्ययन निष्पत्ती प्राप्त नाहीत. या विद्यार्थ्यास मदतीची खूप प्रमाणावर गरज आहे. असा त्याचा अर्थ होतो.
B ) १ या रकान्यात केव्हा टीक करावी?
उदाहरणार्थ ब नावाचा विद्यार्थी Los No १ मध्ये प्रगतशील (Basic /Progressive) मध्ये येत असेल तर त्याच्या नावापुढे १ या रकान्यामध्ये टीक करावी हा विद्यार्थी सामान्य सूचनांचे पालन करतो. याच्याकडे काही चांगल्या कल्पना आहेत.
मात्र त्यामध्ये सुसंगतता नाही. अध्ययनाच्या अनेक टप्प्यावर यास मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हा याचा अर्थ निघतो.
C) २ या रकान्यात केव्हा टीक करावी?
उदाहरणार्थ क नावाचा विद्यार्थी Los No १ मध्ये तो प्रवीण (Proficient) मध्ये येत असेल तर त्याच्या नावापुढे २ या रकान्यामध्ये टीक करावी.
या विद्यार्थ्याने अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त, संपादित केलेल्या आहेत. हा विद्यार्थी आपले कार्य स्वतंत्रपणे करतो. पद्धतशीरपणे तो आपली समस्या निराकरण करतो.
स्वतःच्या कल्पना तो इतरांना स्पष्टपणे सांगतो. याला कमीत कमी मार्गदर्शनाची गरज आहे. असा याचा अर्थ होय.
D) ३ या रकान्यात केव्हा टीक करावी?
उदाहरणार्थ ड नावाचा विद्यार्थी Los No १ मध्ये तो प्रगत (Advanced) मध्ये येत असेल तर त्याच्या नावापुढे ३ या रकान्यामध्ये टीक करावी.
हा विद्याथ्याने अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित केलेल्या आहेत. याची उच्च विश्लेषण क्षमता, तार्किक क्षमता, चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण कौशल्य. स्वतंत्र विचार क्षमता, सृजनशीलता आहे. हा काही एकत्रित संकल्पना अथवा कल्पना याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती करतो.
हा विद्यार्थी सर्व स्तरांमधील कठीण समस्येचे निराकरण करतो. प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता याच्यामध्ये आहे
वरील प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी करावी.
अ. | इयत्ता | डाऊनलोड |
1. | नोंद पत्रक | |
2. | Excel Sheet | |
3. | उर्दू | |
4. | Excel Sheet | |
5. | गोषवारा |
नोंद पत्रक डाऊनलोड करा
| इयत्ता | डाउनलोड | |
|---|---|---|
| 1. | इयत्ता २ री प्रथम भाषा | Download |
| 2. | इयत्ता २ री गणित | Download |
| 3 | इयत्ता २ री इंग्रजी | Download |
| 4. | इयत्ता ३ री प्रथम भाषा | Download |
| 5. | इयत्ता ३ री गणित | Download |
| 6. | इयत्ता ३ री इंग्रजी | Download |
| 7 | इयत्ता ४ थी प्रथम भाषा | Download |
| 8 | इयत्ता ४ थी गणित | Download |
| 9. | इयत्ता ४ थी इंग्रजी | Download |
| 10 | इयत्ता ४ थी परीसर अभ्यास १ | Download |
|---|---|---|
| 11 | इयत्ता ४ थी परीसर अभ्यास २ | Download |
| 12 | इयत्ता ५ वी प्रथम भाषा | Download |
| 13 | इयत्ता ५ वी गणित | Download |
| 14 | इयत्ता ५ वी इंग्रजी | Download |
| 15 | इयत्ता ५ वी परीसर अभ्यास १ | Download |
| 16 | इयत्ता ५ वी परीसर अभ्यास २ | Download |
| 17 | प्रशिक्षण | Download |
| 18 | शिक्षक सूचना | Download |
| 19 | अभ्यास सर्वेक्षण चाचणी | Download |


आपली प्रतिक्रिया व सूचना