FLN Adhyayan Abhyas Survey Planning

FLN अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
प्रगत स्तरावर जाण्यासाठी कृती योजना / आराखडा प्रक्रिया

अध्ययन अभ्यास सर्वेक्षण झालेनंतर शिक्षकाने कोणती प्रक्रिया करावी यासंदर्भात पुढील प्रमाणे सविस्तरपणे मार्गदर्शन केले आहे


शिक्षकांनी सर्वेक्षण साधनानुसार विद्यार्थी प्रतिसाद घेऊन निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रकाच्या आधारे शिक्षकांना खालील बाबी समजण्यास मदत होतील.

१. प्रत्येक विद्यार्थ्याने इयतानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पती किती प्रमाणात प्राप्त / संपादित केलेल्या आहेत, हे समजण्यास मदत होईल.

२. शिक्षकांना आपल्या विषयाचा / वर्गाचा सरासरी संपादणूक स्तर समजण्यास मदत होईल.

३. प्रत्येक विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पतीमध्ये खालीलपैकी संपादणूकीच्या कोणत्या स्तरावर हे लक्षात येईल.

४. सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी उपचारात्मक अध्यापन नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यासाठी व अध्ययन निष्पत्तीसाठी प्राप्त करण्यासाठी करावे लागणार आहे. हे शिक्षकांना आहे, हे शिक्षकांना समजणार आहे.

५. शिक्षकांनी प्रत्येक अध्ययन निष्पत्तीमध्ये सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी कृती योजना / आराखडा तयार करावा.

६. निपुण भारत अभियान चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांनी अशाप्रकारे अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्नपत्रिका / चाचण्यांचे विकसन आपल्या स्तरावर करून विद्यार्थी अपेक्षित क्षमता स्तर प्राप्त करतात की नाही याची आपल्या स्तरावर पडताळणी करणे देखील अपेक्षित आहे.

७. निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्र याची प्रती विद्यार्थीनिहाय माहिती शिक्षकांच्या दप्तरी असणे आवश्यक आहे. 

पर्यवेक्षीय अधिकारी ज्या वेळी शाळाभेटीला येतील त्यावेळी विद्यार्थी अध्ययन श्रेणी व कृति-योजना/आराखडा याबाबत चर्चा करण्यात यावी.

८. निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रामध्ये विद्यार्थीनिहाय एकत्रित माहिती शाळा मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय संकलित स्वरुपात शाळास्तरावर ठेवावी. 
ही माहिती सरळ पोर्टलवर भरणेबाबत यथावकाश सूचना देण्यात येतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad