NMMS Scholarship Exam Admit Card Available

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2022

प्रवेशपत्र उपलब्ध ! डाऊनलोड करा

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा 

दिनांक २१ डिसेंबर २०२२ साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत याबाबतचे प्रसिद्धी निवेदन.


NMMS Scholarship Exam 2022

Hall Ticket Available

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. 

सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे दिनांक १२.१२.२०१२ रोजी पासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

खालील लिंक वर क्लिक करा

www.mscepune.in

https://www.nmms2023.nmmsmsce.in/Index.aspx

Email: mscepune@gmail.com

 याबाबतचे प्रसिध्दी निवेदनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेे

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा 

दिनांक २१ डिसेंबर २०२२

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. 

ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर 

दिनांक १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी

 दिनांक २०.१२.२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका


*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे -१*

*नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल 2.0*

प्रति,

सर्व मा. मुख्याध्यापक 

 सर्व शाळांच्या मुख्याध्यापक यांना सुचीत करण्यात येते की, NMMS परीक्षेचे ओळखपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

*तरी संबंधित विद्यार्थ्यांची माहिती ही आधार नुसार जसेच्या तसे असावे(पूर्ण नाव,जन्म दिनांक).* *दुरुस्ती असल्यास तात्काळ शाळा लॉगइन मधून दुरुस्ती करावी,जेणेकरून जर विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरला तर NATIONAL SCHOLARSHIP PORTAL वरून संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज सादर करतांना NMMS योजना उपलब्ध होईल.*

(पुढील वर्षी नावामध्ये तफावत असल्यास संबंधित पात्र विद्यार्थ्याला नंतर नावामध्ये दुरुस्ती करता येणार नाही व NMMS योजना OPTION मध्ये न दिसल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहील)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad