Intra District Teacher Transfer FAQ Eligible

शिक्षकांच्या बदल्या बदलीपात्र (संवर्ग ४)  (FAQ) शंका समाधान


जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०२२ अंतर्गत संवर्ग ४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी दिनांक २१/०१/२०२३ ते २६/०१/२०२३ दरम्यान बदलीसाठी विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

जिल्हांतर्गत बदली बाबतचा ग्राम विकास विभागाचा दिनांक ०७/०४/२०२१ चा शासन निर्णय व त्याबाबतची सूचना पत्रे यांचा अभ्यास करून कार्यवाही करावी.

संपूर्ण मार्गदर्शन


प्रश्न १ : बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या करताना कोणत्या जागा दाखवल्या जाणार आहेत ?

बदलीपात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त पदे (अनिवार्य ठेवायची पदे वगळून) व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील.

प्रश्न २ : संवर्ग ४ मधून किती शाळांचा विकल्प देणे आवश्यक आहे? :

संवर्ग ४ मधून ३० शाळांचा विकल्प देणे आवश्यक आहे. परंतु प्रणालीवर त्या जिल्ह्यात ३० पेक्षा कमी शाळा उपलब्ध असतील तर उपलब्ध विकल्प देणे आवश्यक आहे.


प्रश्न ३ : बदलीपात्र शिक्षकांनी अर्ज भरणे अनिवार्य आहे का?

होय, शिक्षकांना संवर्ग १, २, ३ किंवा समानिकरणामुळे Tagg केले असेल व जर तुम्ही संवर्ग ४ मधून अर्ज केला नसल्यास त्यावेळी उपलब्ध होणाऱ्या जागेवर बदलीने नियुक्ती होईल.


प्रश्न ४ : संवर्ग ४ मधून प्रशासकीय अर्ज भरला असेल व संवर्ग १, २, ३ कडून किंवा समानिकरणामुळे Tagg केले नसल्यास शिक्षक विस्थापित होईल का?

होय, संवर्ग १, २, ३ किंवा समानीकरणामुळे Tagg केले नसल्यास तुम्ही पुढच्या म्हणजेच विस्थापित शिक्षकांच्या फेरीत जाल. त्या फेरीमध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा विकल्प द्यावे लागतील.

प्रश्न ५ : शिक्षकांनी भरलेला अर्ज रद्द करता येईल का?

होय, बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज सबमिट केल्यानंतर काही चुका झाल्या असतील किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करू शकतात. परंतु एकदा अर्ज भरण्याची मुदत संपली की कोणतीही कार्यवाही करता येणार नाही

प्रश्न ६: संवर्ग ४ मधून प्रशासकीय अर्ज भरला असेल व संवर्ग १, २, ३ कडून किंवा समानिकरणामुळे Tagg केले नसल्यास शिक्षक विस्थापित होईल का?

विस्थापित शिक्षकांच्या फेरीत तुम्ही Tagged झाले नाहीत व अवघड क्षेत्रातील जागा शिल्लक नसतील तर तुमची बदली होणार नाही

प्रश्न ७ : सेवाकनिष्ठ शिक्षक सेवाजेष्ठ शिक्षकांची शाळा मागू शकतात का?

होय, सेवाजेष्ठ किंवा सेवाकनिष्ठ शिक्षक एकमेकांची शाळा मागू शकतात.

संवर्ग-4 शिक्षकांच्या सर्व शंकांचं निरसन करणारा आजचा Vinsys चा व्हिडिओ आवश्यक पहा


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. वरील व्हिडिओमध्ये एका प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही कृपया देणे
    प्रश्न:- ज्या शिक्षकांना संवर्ग 1,2, व 3 ने या आधीच Tagged केलेले आहे त्या शिक्षकांनी ह्या राउंडमध्ये 30 पर्याय देऊनही जर त्यांना शाळा मिळाली नाही तर ते विस्थापितांच्या राऊंडमध्ये जाणार का ?
    की सिस्टीम त्यांना आपोआप जागा देणार?
    आपोआप जागा दिल्या गेल्या तर तो मोठा अन्याय होईल.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad