Class First To Eight Evaluation Project List Very Useful

इ. १ ली ते ८ वी साठी प्रकल्प यादी


 प्रकल्प यादी

इ. १ ली ते ८ वी साठी प्रकल्प

नमस्कार मित्रांनो,  इ.१ली ते ८ वीचे नमुनादाखल काही प्रकल्प टाकत
आहे ज्याचा उपयोग निश्चितच
आपणास होईल. 

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी 

भाषा

• नेहमी चुकणारे शब्द व त्याचा संग्रह करणे.
• परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे 
पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे
जमविणे.
• बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे
• चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे,
• उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग
* परिसरातील विविध स्थळांची माहिती
* वाढदिवस, सहल प्रसंगाचे वर्णन
• कथा व कवितांचा संग्रह करणे * सार्वजनिक ठिकाणे दुकाने इ. ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह
• वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे
'निवडक उतार्याचा संग्रह करणे.
• भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे
• स्वातंत्र्य लढयातील नेत्यांचे फोटो जमविणे. 
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा शेतकरी दुकानदार सरपंच ग्रामसेवक
तलाठी,शिक्षिका

• देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
• विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे 
• विविध पत्राचे नमुने जमा करणे.
 • अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे.
* पाऊस विषयावरील कविता / चित्राचा संग्रह करणे
 * शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे,
• पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह
* तुळस व अन्य औषधी वनस्पतीची माहिती मिळवा
• आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा
'आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
 • वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणीचा संग्रह करा.

गणित

• नाण्याचा व नोटांचा संग्रह करणे.
'पुठ्याचे विविध आकार तयार करणे अर्धा पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे 'आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
• बिलाच्या विविध पावल्यांचा संग्रह करणे.
• विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे, 

सामान्य विज्ञान -

• परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे चित्रे जमविणे
• परिसरातील वृक्ष व त्याचे अवयव
• आपले शरीर संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग
• चांगल्या सवयींची यादी - अंगीकार
.
• पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी • प्राण्यांचे अवयव व त्याचे उपयोग चित्रासह)
• ज्ञानेंद्रिये चित्रे व त्यांचे कार्य.  वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण
 • परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग
• उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग
'मातीचे प्रकार व नमुने संग्रह,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी
'शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
 • पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती
• शास्त्रजांची नावे व लावलेले शोध तक्ता
* वीस अन्नपदार्थाची यादी करा. त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
पदार्थाची स्थायू द्रव वायू गटात विभागणी
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा 'पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदूषण व पाणी प्रदूषण याविषयी माहिती संकलित करा

इतिहास व ना शास्त्र


 शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा
• दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे.
• ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे. 
• संतांची चित्रे व माहिती
• शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह.
• विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह
'अश्मयुगीन हत्यारांची यादी करा. चित्रे मिळवा. 
• शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती
• जहाजांची चित्रे जमवा.
• गड व किल्ले यांची चित्रे जमवा. माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा
• हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
• समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

भूगोल-


• आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती
• ऋतू महिने व पिके यांचा तक्ता.
• परिसर भेट नदी कारखाना
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती • परिसरातील पिके व त्यांचा हंगाम
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण
• गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे
• खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे
• विविध धान्यांचे नमुने जमवा  परिसरातील प्रदुषणाची कारणे यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट दया वस्तूंची यादी करा
• विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

वर्ग निहाय  प्रकल्प यादी

इयत्ता १ ली •


अ) भाषा :-

१) पाठ्यपुस्तकातील चित्रांना अनुसरुन चित्रे जमविणे.

२) चित्रे रंगविणे

३) चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.

४) पाने, फुले, फळे जमविणे.

५) परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नांवे सांगणे.

६) बडबडगीते तोंडपाठ करणे.

७) न्हाईम्स पाठ करणे.

ब) गणित :-

१) दिलेल्या वस्तूतून लहान-मोठा ठरविणे.

२) तराजूच्या सहाय्याने जड-हलके ओळखणे.

३) आधी व नंतर घटनांची यादी करणे.

४) कमी जास्त ओळखणे. -

५) चित्रांच्या सहाय्याने स्थान ओळखता येणे.

६) परिसरातील वस्तूंचे प्रकारानुसार वर्गीकरण.

७) सारखे रूप असणाऱ्या वस्तूंच्या जोड्या

इयत्ता २ री

अ) भाषा-

१) पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.

२) प्राणी व पशुपक्ष्यांची चित्रे जमविणे.

३) चित्रावर आधारित गोष्ट सांगणे / तयार करणे.

४) चिमणीचे घरटे

५) नदीचे फायदे-तोटे चित्रे जमविणे.

६) परिसरातील स्थळाला भेट परिसर सहल.

७) वैशिष्ट्यावरुन जोड्या जुळवा. उदा. रूम झूम वाजतात घुंगरु (पान-६४ ) -

८) उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग.

ब) गणित :-

१) घटनाक्रम ठरविणे.

२) नाण्यांचा संग्रह

३) नोटांचा संग्रह (असली किंवा नकली)

४) वेगवेगळ्या वस्तूंचे वजन नोंदविणे.

५) वर्षाचे महिने, दिवस (इंग्रजी व भारतीय सौर)

६) कोणत्या क्रिया कराल ? (उदा. देवून उलटे घेणे)

७) कागदाचे विविध आकार बनविणे.

८) सौर वर्ष व ग्रेगरिन वर्ष याचे तक्ते (पुस्तकातील शेवटचे पान)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad