Ads Area

Rajya Shalet Shala Purv Tayari Abhiyan Rabavinar

राज्यातील शाळेत शाळापूर्व तयारी 

अभियान २०२३ राबविणार

शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंमलबजावणी बाबत

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये मागील वर्षी मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान" अंतर्गत “पहिले पाऊल" हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे.

 शाळापूर्व तयारी २०२३

त्यानुसार २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ज्या बालकांची शाळापूर्व तयारी झालेली असते त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते.

 त्या दृष्टीने इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे या करिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. 

शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२३ आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२३ मध्ये आयोजित करण्यात येईल. 

दोन्ही मेळाव्यादरम्यान १ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालक करून घेतील. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करतील.

त्यानुसार उपक्रमांतर्गत प्रशिक्षणे व मेळाव्याचे नियोजन पुढीलप्रमाणे :

प्रशिक्षण आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना :

१ जिल्हा स्तर प्रशिक्षण: प्राचार्य, DIET यांनी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करावे. प्रत्येक तालुक्यातून (BRC, URC) दोन व्यक्ती या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतील. जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीची मागील वर्षीची जिल्हानिहाय यादी (Excel Sheet) सोबत संलग्न करण्यात आली आहे. तथापि आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर प्रशिक्षणार्थीची निवड करावी.

२ तालुकास्तरीय प्रशिक्षण : तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन प्राचार्य, DIET यांनी सबंधित गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे. एक दिवसीय वेळापत्रकाप्रमाणे तालुकास्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील. तालुकास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीची मागील वर्षीची जिल्हा निहाय यादी (Excel Sheet) सोबत संलग्न करण्यात आली आहे. तथापि आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर प्रशिक्षणार्थीची निवड करावी.

३ केंद्र स्तरीय प्रशिक्षण : दिनांक १७ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत एक दिवस सकाळी अर्धवेळ शाळा भरवून स. १० ते ५ या वेळेत नियोजनाप्रमाने केंद्रस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे.

 सबंधित जिल्ह्याच्या DIET ने नमूद कालावधीत केंद्र स्तरीय प्रशिक्षणासाठी एक दिवस निश्चित करावा व तसे सर्व गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख यांना कळवावे. DIET ने दिलेल्या नियोजनाप्रमाणे केंद्र प्रमुख व केंद्र शाळा यांनी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करावे.

तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे केंद्र स्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील. 

केंद्रातील सर्व जि.प., न.प., न.पा., म.न.पा., शाळांचे शिक्षक (इ. १ ते ५) व मुख्याध्यापक तसेच केंद्राच्या कार्यकक्षेतील सर्व अंगणवाडी सेविका केंद्रस्तरीय प्रशिक्षणात सहभागी होतील.

 ४. प्रशिक्षण उपस्थिती, प्रशिक्षण अभिलेखे, छायाचित्रे, चित्रफिती आपल्या स्तरावर जतन करून ठेवाव्यात.

५. संदर्भ क्र. २ अन्वये मा. राज्य प्रकल्प संचालक, MPSP, मुंबई यांचेकडून सन २०२३ - २४ मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येईल.

९. प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडीओ (२ किंवा ३ मिनिटांचे), फोटो इ. माहिती समाजसंपर्क माध्यमांवर (फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, इ.) #shalapurvtayari2023 या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करावेत. समाजसंपर्क माध्यमांवर पोस्ट अपलोड करताना स्थळाचे नाव व जिल्हा नमूद करावा.

शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढीलप्रमाणे : १. जिल्ह्यातील जि.प., म.न.पा., व न.पा.च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व

प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न.पा. व ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे. 

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. 

मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४

तासांचा असावा.

३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी, व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

५. उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात. 

सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे :

 १) नोंदणी (रजिस्ट्रेशन), 

२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास), 

३) बौद्धिक विकास,

 ४) सामाजिक आणि भावनात्मक विकास, 

५) भाषा विकास, 

६) गणनपूर्व तयारी, 

७) पालकांना मार्गदर्शन.

६. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने प्राचार्य, डायट, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, ICDS विभाग यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न.पा. यांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना द्याव्यात.

७. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे.

८. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन करावे.

 त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन

शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

९. प्रत्येक शाळेमध्ये मेळाव्याच्या दिवशी बॅनर व पोस्टर तयार करून लावण्यासाठी रु. ३००/- प्रमाणे (प्रति शाळा) रक्कम संदर्भ क्र. २ अन्वये मा. राज्य प्रकल्प संचालक, MPSP, मुंबई यांचेकडून सन २०२३-२४ मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येईल. अतिरिक्त खर्च मंजूर केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

बॅनर साईज ५ x ३ फूट याप्रमाणे व पोस्टर साईझ २.५ x २ फुट याप्रमाणे प्रिंटींग करण्यात यावी. सोबत बॅनर व पोस्टर नमुना जोडला आहे.

१०. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना

 #ShalapurvaTayariAbhiyan 2023, व #शाळापूर्व तयारी अभियान 2022 

या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert 

या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad