UDISE PLUS Teacher And Student Online Information Check Instructions

युडायस प्लस २०२२-२३ ऑनलाईन माहिती भरणे व तपासणे संदर्भात सूचना प्राप्त ! सविस्तर वाचा

UDISE PLUS Student Portal

विद्यार्थी माहिती

विद्यार्थी माहिती Certified करायची आहे

Step

1) प्रथम Login करावे

2) Certificate Tab वर क्लिक करा

3) Certificate डाऊनलोड करा

4) विद्यार्थी पटसंख्या तपासून घ्या

5 सर्व माहिती बरोबर असेल तर Submit करा

खालील लिंक वर क्लिक करा

भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भिय पत्रांनुसार युडायस प्लस २०२२-२३ प्रणालीची सर्व माहिती अचूक भरण्याच्या सूचना या कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच वेळोवेळी Zoom Meeting घेऊन सर्व गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तर Programmer, तालुका स्तर MIS- Coordinator, Data Entry Operator यांना युडायस प्लस २०२२ - २३ प्रणालीमध्ये माहिती भरण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

 तसेच What's app ग्रुपवर दररोज Progressive Report मेसेजेस व्दारा पाठविला जातो, तरी देखील अद्याप राज्यातील ९३४१ शाळांचे Student Entry काम शून्य आहे. 

तसेच राज्याचे Student Entry काम अद्यापही ३५% अपूर्ण आहे. 

साधारण ७८ लाख विद्यार्थ्याची माहिती अद्याप भरलेली नाही, 

शिवाय शाळांनी भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत

युडायस २०२२-२३ प्रणाली माहितीचे विश्लेषण केले असता शाळा, शिक्षक यांच्या संदर्भातही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे राज्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी गटशिक्षणाधिकारी यांनी युडायस प्रणालीवरील सर्व माहिती अचूक भरण्यासाठी आपल्या स्तरावरून मुख्याध्यापकांना लेखी सूचना देण्यात द्याव्यात. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व समग्र शिक्षा कर्मचारी यांचेकडून युडायस प्लस २०२२-२३ फॉर्म तपासणी काटेकोरपणे करून फॉर्ममधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री आपण करून घ्यावी. मुख्याध्यापकांकडून त्रुटी राहील्या असल्यास त्यांच्याकडूनच त्वरीत दुरुस्त्या करून घ्याव्यात.

UDISE फॉर्म तपासणी करताना खालील महत्त्वाच्या मुद्यांची मदत घ्यावी..

अ) शाळा पोर्टलबाबत माहिती तपासत असताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री
करावी.

१. शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रकार
२. शाळेची इमारत आहे / नाही व प्रकार
३. वर्ग खोल्यांची माहिती
४. शाळेचे अक्षांश व रेखांश स्थान
५. शाळा निवासी / अनिवासी/अंशत: निवासी
६. शाळा स्थापनेचे वर्ष
७. गाव/ वॉर्ड As per LGD
८. मुख्याध्यापकांचे नाव व संपर्क क्रमांक
९. अधिकाऱ्यांनी शाळेला दिलेल्या भेटींची माहिती 
१०. शाळेला मिळालेल्या विविध अनुदानांची माहिती
११. शाळेला मिळालेल्या पाठ्यपुस्तक व गणवेशाची माहिती
१२. ग्रंथालय - शाळेत उपलब्ध असलेल्या पुस्तकांची अचूक संख्या
१३. शाळेचे ठिकाण- ग्रामीण/शहरी

ब) शाळेत उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती तपासताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी.

१. पिण्याच्या पाण्याची सुविधा व स्त्रोत
२. सर्व मुले व मुलींसाठी उपलब्ध असलेले स्वच्छतागृह
३. CWSN मुले व मुलींसाठी उपलब्ध असलेले स्वच्छतागृह
(कमोड खुर्चीसुध्दा चालेल)
४. किचन गार्डन 
५. कम्पाऊंड वॉल
६. खेळाचे मैदान
७. रॅम्प
८. विद्युत सुविधा
९. किचन शेड
१०.कम्पाऊंड वॉल दुरुस्ती
११. स्वच्छतागृह दुरुस्ती

१२. शाळा इमारत दुरुस्ती


क) शिक्षक पोर्टलवर माहिती तपासत असताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी.

१. शिक्षकांचे पूर्ण नाव 
२. लिंग पुरुष / स्त्री
३. जन्म दिनांक
४. प्रवर्ग (Category ) 
५. आधार क्रमांक
६. मोबाईल क्रमांक
७. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता
८. शिक्षकांनी घेतलेल्या प्रशिक्षणाची माहिती

ड) विद्यार्थी पोर्टलवर माहिती तपासत असताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी.

१. विद्यार्थ्याचे पूर्ण नाव
२. लिंग - पुरुष / स्त्री / तृतीय
३. आधार क्रमांक
४. प्रवर्ग (Category)
५. शाळा प्रवेश क्रमांक व दिनांक
६. दिव्यांगाचा प्रकार
७. BPL ची माहिती
८. दिव्यांग (CWSN) विद्यार्थ्यांचा तपशील
९. शैक्षणिक वर्षात मिळालेल्या सुविधा, शिष्यवृत्ती इ. माहिती
१०. प्रतिभावंत विद्यार्थ्यांची माहिती

इ) PGI संदर्भातील महत्त्वाच्या बाबी अचूक असल्याची खात्री करावी.

१. आपत्ती व्यवस्थापन व शाळा सुरक्षितता
२. शालेय पोषण आहार
3. Fit India Certificate
४. शिक्षक आधार सिडेड माहिती
५. शिक्षक ओळखपत्र व फोटो 
६. शाळेतील ईको व युथ क्लब
७. विद्यार्थी मूल्यमापन व प्रगतीपत्रक
८. संगणक व डिजिटल साहित्य
९. Vocational Education

शाळा विद्यार्थी यांना द्यावयाचे विविध लाभ, PGI गुणांकन, शिक्षण विभागाची सांख्यिकी माहिती इ. घटकांशी सदर माहिती निगडीत असल्याने गांभीर्याने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.

 ज्या शाळांची युडायस फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरून पूर्ण झाली आहे. त्यांनी फॉर्म Finalise करावा. 

आपल्या तालुक्यातील सर्व शाळांची युडायस प्लस २०२२-२३ प्रणालीमधील माहिती अचूक असल्याची खात्री करून गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्याची UDISE प्लस माहिती दिनांक २९/०३/२०२२ पर्यंत अंतिम करावी , असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad