सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये आधार व्हॅलिडेशन करावे लागणार! वाचा सविस्तर
सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करून घेणेबाबत! मार्गदर्शन सूचना प्राप्त
संदर्भ: शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे दि. ३०/०८/२०२२ रोजीचे पत्र.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने भारत सरकार शिक्षा मंत्रालय यांचेकडे राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
यु-डायस प्लस मध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करण्याकरता शाळास्तरावर टॅब ओपन झालेली आहे.
आपल्या मार्फत तालुक्यातील सर्व शाळांना आधार व्हॅलिडेशन करण्याकरिता शाळांमधील मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. व्हॅलिडेशन करताना काही अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदविलेले नावाप्रमाणे यु-डायस प्लसमध्ये नाव नोंदविण्यात यावे. सदरचे व्हॅलिडेशन दिनांक ३० एप्रिल, २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रणाली सुरू ठेवण्यात आलेली आहे.
शाळांची माहिती वेळेत पूर्ण करून न घेतल्यास याबाबतची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी
आपली प्रतिक्रिया व सूचना