ब्रेकिंग!शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर
व १२ जूनपासून होणार शाळा सुरू
|विद्यार्थी व पालकांसाठी मोठी
बातमी सविस्तर वाचा
पुणे - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना दिनांक २ मे २०२३ पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
तर नवीन शैक्षणिक वर्ष दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू होणार आहे म्हणजे ४१ दिवसाची सुट्टी मिळणार आहे
विदर्भात मात्र, दिनांक २५ जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, एकुण ५६ दिवसाची सुट्टी मिळणार आहे
तसेच शाळा दिनांक २६ जुन २०२३पासून सुरू होणार आहे
शिक्षण विभागाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
Maharashtra School Summer Vacation
पहा काय सांगितले शिक्षण विभागाने
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दिनांक ३० एप्रिलपर्यंत लागणार आहे.
हा निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळांची आणि महाविद्यालयांची असणार आहे
तर शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या ७६ पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
याशिवाय बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, तर दहावीचा निकाल त्यानंतर ८ ते १० दिवसांत जाहीर होऊ शकतो, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दरम्यान आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बस असोसिएशनने स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी दिनांक १२ जूनपासून शाळा सुरू होणार - हि बातमी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा


आपली प्रतिक्रिया व सूचना