उन्हाळी सुट्टीतील पालकासाठी
गृहपाठ व विद्यार्थी चांगल्या सवयी
For the parent on summer vacation
Homework and good student habits
उन्हाळी सुट्टी जाहीर
पालकासाठी सुट्टीतील गृहपाठ :-
(१) रोज सकाळ-संध्याकाळचे जेवण आपल्या मुलांसोबत करा. अन्न वाया जावू देवू नका, त्यांचे ताट त्यांना धुवू द्या.
(२) भाजी निवडणे, झाडणे- लोटणे, कपडे धुणे अशी कामे त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या
(३) शेजारी रहाणाऱ्या कुटूंबाकडे जावून त्यांच्याशी जवळीक वाढविण्याची संधी द्या
दुसन्यांच्या मुलांना आपल्या घरी बोलवा,
(४) आजी-आजोबांसोबत गप्पा मारण्याची संधी द्या. त्यांच्या सोबत मुलांचे फोटो काढा.
(५) आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना घेवून जा. आपण किती कष्ट करतो ? कोणते काम करतो? हे मुलांना कळू द्या. त्याची माहिती मुलांना द्या.
(६) स्थानिक यात्रा, बाज़ार अशा ठिकाणी मुलांना सोबत न्या
(७) आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या पूर्वजांची माहिती मुलांना सांगा...
(८) मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांना बोलते करा,
(९) मुलांना इयत्तेनुसार १ ते ३ तास अभ्यासासाठी घरातील नेमून दिलेल्या ठिकाणी बसवा.
(१०) मुलांना खेळु द्या, पडु द्या, कपडे खराब होवु द्या.
(११) मुलांना किमान एकतरी पुस्तक विकत घेवुन द्या.
(१२) स्वतः मोबाईलचा मर्यादित वापर करा
(१३) मुलाचा चेहरा दोन्ही हातात धरून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा. ईश्वराने किती अनमोल भेट आपणास दिली आहे. याचा आनंद घ्या
(१४) 'मुलाचे सर्व हट्ट पुरविणे' म्हणजे चांगले पालकत्व. ही खुळचट कल्पना डोक्यातून काढून टाका..
(१५) आम्ही शिक्षक आणि तुम्ही पालक मिळून उद्याचे सुजाण नागरिक घडवू या.
Nipun Maharashtra Abhiyan


Shravani
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना