State Level Old Pension Scheme Strike Salary

संप काळातील असाधारण रजा ही

अर्जित रजा मंजूर आजचा शासन

निर्णय संप काळातील संपूर्ण वेतन 

मिळण्याचा मार्ग मोकळा


मोठी बातमी!  राज्यव्यापी जुनी पेन्शन योजना संपात सहभागी कर्मचारी यांची अर्जित रजा मंजूर! शासन परिपत्रक

१७ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या

 दिनांक १४ मार्च ते २० मार्च, २०२३ या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी/अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यांची अनुपस्थिती संदर्भ क्र. २ येथील दिनांक २८ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये “असाधारण रजा” म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी “ असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अर्जित रजा मंजूर

शासन निर्णय :-

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात (जुनी पेन्शन योजना Old Pension Scheme ) 

दिनांक १४ मार्च, २०२३ ते २० मार्च, २०२३ या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी/अधिकारी सहभागी झाले होते,

 त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पुर्वोदाहरण होणार नाही या अटीवर “असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०४१३१६१२५१६९०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. 

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी - आता 'या' दिवसांचा हि मिळणार पगार

 तुम्हाला माहिती असेल कर्मचाऱ्यांनी 14 मार्च ते 20 मार्च या काळात संप केला होता. तर या सात दिवसांच्या कालावधीत संपात सहभागी झालेल्या कर्मचारी, शिक्षकांचा पगार कापला जाणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. मात्र आता -

पहा काय सांगितले राज्य सरकारने

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात येणार नसून त्या पगारी रजा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. 

राज्यभरातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारातून सुमारे 1200 कोटी रुपये कापण्यात येणार होते. पण आता सर्व कर्मचाऱ्यांना संपकाळातील पगार मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

अर्जित रजा नमुना

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad