विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोठी
बातमी ! - आता राज्यात लागू
होणार 'एक राज्य-एक गणवेश'
धोरण| शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य
राज्यात 'एक राज्य-एक गणवेश' हे धोरण येत्या सन 2023 - 2024 नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे अशी घोषणा शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत दिनांक 23 मे ला झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
राज्यातील सर्व सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसणार
मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट
मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
शाळांमध्ये सलवार कुर्ता असले तर गडद निळ्या रंगाची सलवार आणि आकाशी रंगाचा कुर्ता
पहा काय म्हणाले शिक्षणमंत्री
राज्यभरातील सर्व सहकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आता चालू वर्षापासून एकाच रंगाचा गणवेश असणार आहे त्यात आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा गणवेश विद्यार्थ्यांना परिधान करावा लागणार आहे.
मात्र ज्या शाळांनी या निर्णयापूर्वी कपड्यांच्या ऑर्डर दिल्या असतील तर अशा ठिकाणी शाळांनी ठरवलेला गणवेश तीन दिवस परिधान करावयाचा आहे -
आणि त्यानंतर पुढील तीन दिवस राज्य सरकारने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करावयाचा आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
आता राज्यात 'एक राज्य-एक गणवेश' धोरण लागू होणार - हि बातमी प्रत्येक विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
ब्रेकिंग न्यूज ! आणि शैक्षणिक अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर
आपली प्रतिक्रिया व सूचना