केंद्रप्रमुख पदभरती संदर्भात
मार्गदर्शनपर आलेले महत्वाचे
परिपत्रक निर्गमित उप सचिव
केंद्रप्रमुख पदोन्नतीकरीता मार्गदर्शन मिळण्याबाबत
उपरोक्त विषयांकित केंद्रप्रमुखांच्या पदभरतीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश लक्षात घेऊन आपणांस कळविण्यात येते की, केंद्रप्रमुख (पदभरती) करतांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक ०१.१२.२०२२ च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांच्या पदभरतीचे प्रमाण ५०% पदोन्नतीने व ५०% मर्यादीत स्पर्धा परिक्षेप्रमाणे करण्यात यावी.
मात्र ग्रामविकास विभागातील दिनांक १०.०६.२०१४ ची अधिसुचना अद्याप रदद वा अधिक्रमित केली नसल्यामुळे केंद्र प्रमुख पदभरती करतांना विषय निहाय विभागणी ही सदर अधिसुचनेमध्ये विहित केल्याप्रमाणे करण्यात यावी.
आपल्या संदर्भाधिन पत्रातील मुददा क्र. ५ च्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, शासन अधिसुचना दिनांक १० जून २०१४ मध्ये ज्यांनी, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवाजेष्ठतेच्या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येतील असे नमुद आहे त्यामुळे विशिष्ट विषयात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणुन सेवेचा उल्लेख अधिसूचनेत नाही त्यामुळे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणुन कोणत्याही विषयात तीन वर्षे अखंड सेवा केल्यानंतर सध्या जो पदवीचा विषय आहे त्या विषयात संबंधित प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांस केंद्र प्रमुख म्हणुन पदोन्नती दयावी.
उप सचिव, महाराष्ट्र शासन
आपली प्रतिक्रिया व सूचना