Breaking News Std Eleven Online Admission Schedule Announce

ब्रेकिंग ! अकरावीच्या ऑनलाईन 

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर -

विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी


राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा (SSC Board Exam Maharashtra 2023) दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.


 राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे

पहा कसे असेल वेळापत्रक

● प्रवेश अर्ज (भाग एक)-  

दिनांक 25 मे 2023 सकाळी 11 वाजल्यापासून ते दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल जाहीर होईपर्यंत.

● प्रवेश अर्ज (भाग दोन)- 

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येणार. 

● प्रवेश प्रक्रिया (पहिली फेरी) -

 निकाल जाहीर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केली जाणार.

 यानंतरच्या प्रवेश फेऱ्यांबाबत परीक्षा बोर्ड लवकरच माहिती जाहीर करेल.

इ.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन. २०२३ २४ साठी पूर्वतयारी सुरु 

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, सन. २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन. २०२३-२४ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इ. ११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. 

त्यानुषंगाने इ. ११वी प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व दिशानिर्देश विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.

राज्यमंडळ इयत्ता १० वी परीक्षा २०२३ समाप्त झालेली आहे तसेच सीबीएसई, सीआयएससीई इत्यादी मंडळांचे इ.१०वी निकालही जाहीर झालेले आहेत.

 राज्यमंडळाचा इ.१० वी निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे इ.१०वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सन. २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार इ. ११वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थी पालकांना मिळावे व प्रवेशाबाबत सर्व सूचना वेळेत निर्गमित करता याव्यात यानुषंगाने आवश्यक नियोजन व कृती आराखडा आपले स्तरावरुन तयार करावा.

 क्षेत्रीय स्तरावर समन्वय यंत्रणा सक्षम करुन त्यानुसार कार्यवाही करावी.

उक्त ऑनलाईन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन करण्यात येत आहेत. अशा ऑनलाईन क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनाही या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे.

मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणेबाबत जागृत करावे. 

अशा विद्यार्थ्यांना सदर कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत विनंती सबंधित महसूल यंत्रणेस करणे, माध्यमिक शाळांनी आपले विद्यालयातील इ. ९वी १०वी मधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतांनाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात.

इ. ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया २०२३ २४ साठी पूर्वतयारी त्वरीत सरु करणेत यावी. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. विद्यार्थी, पालक यांचेसाठी उद्बोधन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. प्रवेश प्रक्रियेबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी. शंका समाधान व्यवस्था करावी.

सन २०२३ २४ इ. ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेच्या विविध टप्पे व संभाव्य वेळापत्रक सोबत संलग्न आहे. त्यानुसार प्रसिद्धी देऊन पुढील कार्यवाही सुरु करणेत यावी.

 दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू . 

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले - हि बातमी अकरावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे,

 आपण इतरांना देखील शेअर करा

What's Up Group Join

दहावी निकाल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad