वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू
करण्यासाठी महत्वाचे! सविस्तर वाचा
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आय. डी व पासवर्ड बाबत..
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे पात्र प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १० जुलै, २०२३ पासून २४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
१. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी अजून Infosys springboard app download केले नसेल त्यांना दिनांक १०/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून आय डी व पासवर्ड आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर तसेच मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारा प्राप्त होतील.
२. जे प्रशिक्षणार्थी मागील वर्षी(२०२१-२२) आपले प्रशिक्षण काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाहीत परंतु या वर्षी पुन्हा नवीन नोंदणी केली आहे त्यांना आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी आपला पूर्वीचाच ईमेल आयडी व पासवर्ड वापरून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.
३. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी यावर्षी (२०२३-२४) नोंदणी केली आहे परंतु दिनांक १०/०७/२०२३ रोजी आय डी व पासवर्ड मिळण्यापूर्वीच infosys springboard app download करून ठेवले आहे त्यांनाही आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही.
त्यांनी Infosys springboard app मध्ये आपला ईमेल व app sign in करते वेळी वापरलेला पासवर्ड वापरावा अथवा पासवर्डच्या खाली दिसणारे Gmail बटन क्लिक करून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे
*वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना प्रशिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा!*
आजपासून सकाळी 11 वाजेपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण करणाऱ्या नोंदणी (रजिस्टर) केलेल्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू होणार आहे...
- सदरचे प्रशिक्षण हे पात्र प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १० जुलै, २०२३ पासून २४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे...
- सदर प्रशिक्षण हे फक्त मराठी भाषेत आहे...
- सदर प्रशिक्षण शाळेच्या वेळेत करू नये...
- सदर प्रशिक्षण ऑनलाईन असल्याने कधी ही करू शकता येते...
(सकाळी,दुपारी, रात्री)
- प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ४५ दिवसांच्या कालावधी मध्येच पूर्ण करणे अनिवार्य आहे...
- तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही...
- सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन / निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल...
*महत्वाचे...*
सर्व पात्र प्रशिक्षणार्थी काही अडचणी/ शंका असल्यास तर दररोज
*दैनिक शंका समाधान सत्र तपशील...*
*विषय: SCERT महाराष्ट्राची वरिष्ठ आणि निवड प्रशिक्षण झूम बैठक*
वेळ: सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 पर्यंत
मीटिंग आयडी: 9915639 2904
पासकोड: 175287
पुन्हा एकदा सर्व पात्र प्रशिक्षणार्थी (शिक्षक बंधू भगिनींना) खूप खूप शुभेच्छा...
वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा

.jpg)
आपली प्रतिक्रिया व सूचना