Breaking News Class Eleven And HSC Students Board Exam Twice A Year

ब्रेकिंग ! - 11वी-12वी च्या

अभ्यासक्रमात होणार महत्त्वाचे बदल

आता वर्षातून दोन वेळा होणार 

बोर्डाच्या परीक्षा ! वाचा सविस्तर 

Board exams will be held twice a year

 शिक्षण मंत्रालय, 2024 पासून शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट आज तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. 

 त्यानुसार आता 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे. 

पहा काय बदल होणार

 शिक्षण मंत्रालयाने म्हटले की नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, त्यापैकी किमान एक भारतीय भाषा अनिवार्य असेल.

तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल. 

नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11 वी आणि 12 वीमधील विषयांची निवड 'स्ट्रीम' पूर्ती मर्यादित राहणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. 

तसेच वर्गखोल्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम संपवण्याची प्रथा यामुळे संपुष्टात येईल. याशिवाय पाठ्यपुस्तकांच्या किंमती कमी होतील, असेही शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय ! - आता वर्षातून दोनदा होणार दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा

 दहावी, बारावी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. कारण काल दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसंदर्भात काही बदल मंत्रालयाने केले आहे. 

 हा बदल करुनच आता २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात नवीन पुस्तके येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा हा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीकडून हा आराखडा प्रसिद्ध झाला आहे.

जाणून घ्या काय बदल होणार

 नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. 

त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. तसेच या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांकडे असेल. 

का केला बदल ?

 विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षेचा ताण येऊ नये, या परीक्षा त्याच्यासाठी सुलभ असाव्या, त्यांना चांगले गुण मिळविण्याची संधी मिळावी, या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

तसेच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन भाषा सक्तीच्या असणार आहे. त्यातील एक भाषा स्थानिक भारतीय भाषा असणार आहे 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार - आता वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा होणार हि बातमी आपण इतर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नक्की शेअर करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad