चंद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण
पाहण्यासाठी आज विशेष
संमेलन आयोजित
आज चंद्रयान-३ चंद्रावर उतरणार
ISRO :- दिनांक २३.०८. २०२३ रोजी चंद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विशेष संमेलन आयोजित करण्याबाबत.
संदर्भ: शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक २१.०८.२०२३
आपल्याला माहिती आहे की, चंद्रयान-३ मोहिम ही भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगासाठीच नव्हे तर अँड इंडिया या साठीही एक मोठे पाऊल आहे. चंद्रयान- ३ मोहिम अंतिम टप्यात आली असून भारताचे अंतराळ संशोधन उल्लेखनीय टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे.
भारताचे चंद्रयान- ३ चंद्रावर उतरणे हा एक अमूल्य प्रसंग आहे. आपल्यासाठी उत्सुकता अभिमान वाढणारा प्रसंग तर आहेच पण शालेय विद्यार्थ्यामध्ये शोधाची आवड निर्माण होण्यासाठी देखिल उपयुक्त प्रसंग आहे.
चंद्रयान- ३ चे थेट प्रक्षेपण दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ रोजी दुपारी ०५.३० ते ०६.३० या वेळात विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्म (इस्त्रो वेबसाईट, इस्त्रो युटूब Channel, इस्त्रोफेसबुक पेज, डी.डी. नॅशनल टि.व्ही चॅनल) वर पाहता येणार आहे.
तसेच दिनांक २४ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी देखील आयोजित केले आहे.
त्यानुषंगाने उक्त थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक यांचे एकत्रित विशेष संमेल्लन आयोजित करण्याबाबत संबंधित क्षेत्रिय कार्यालयांना/ शाळांना आपल्यास्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.
कालावधी
• दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ रोजी
• वेळ - दुपारी ०५.३० ते ०६.३०
Chandrayaan-3 Mission Soft-landing LIVE Telecast
चंद्रयान 3 मोहीम यशस्वीपणे पार
चांद्रयान-3 लॅण्डिंगचे चार टप्पे
चंद्राच्या पृष्ठभागापासून लॅण्डरची उंची 800 मीटर ते 1300 मीटर असेल
विक्रमचे सेन्सर्स कार्यान्वित होतील आणि त्याची उंची मोजली जाईल
पुढच्या 131 सेकंदात लॅण्डर पृष्ठभागापासून 150 मीटरवर येईल
लॅण्डवरचा धोका शोधक कॅमेरा पृष्ठभागाच्या प्रतिमा कॅप्चर करेल
विक्रमवर बसवलेला धोका शोधणारा कॅमेरा रन करेल
प्रतिकूल परिस्थिती असेल तर विक्रम 73 सेकंदात चंद्रावर उतरेल
जर नो- गो अट असेल तर 150 मीटर पुढे जाऊन थांबेल
पुन्हा पृष्ठभाग तपासेल आणि सर्व ठीक असेल तर लॅण्ड होईल

Parth kadam
ReplyDeleteWow
ReplyDelete👍
ReplyDeleteAariya Chaudhari
Deleteआपली प्रतिक्रिया व सूचना