YCMOU (शिक्षणशास्त्र पदवी)
B.ED प्रवेश प्रक्रियेस सुरवात !
आपला अर्ज इथे करा
सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानितयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
(नॅक मानांकित 'अ' श्रेणी)
'ज्ञानगंगोत्री', गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक ४२२२२२
एन.सी.टी.ई. मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80) B.ED
प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२३ - २५
प्रवेश पात्रतेच्या अटी
(१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण पदव्युत्तर पदवी.
(३) डी.एड./डी.टी.एड./ क्राफ्ट टिचर डिप्लोमा पूर्ण केलेले.
प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या खालील
वेबसाईटवर उपलब्ध आहे.
प्रक्रिया शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व
राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.
श्री. भटूप्रसाद पाटील कुलसचिव (प्र.)
बी. एड. प्रवेश २०२३ - २५ प्रवेशार्थीसाठी प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना
दिनांक : २१/०८/२०२३
१) प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी करावयाची पूर्वतयारी
१.१ विद्यापीठाच्या वेबसाईटवरील सन २०२३ - २५ या तुकडीच्या माहितीपुस्तिकेत बारकाईने वाचन करणे. १.२ अद्ययावत फोटो व सही Scan करून ठेवणे.
१.३ सेवा आदेश व संबंधित सक्षम अधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र (परिशिष्ट क्र. ६ माहितीपुस्तिका पान क्र. ३६)
१.४ जन्मतारखेचा दाखला
१.५ पदवी, पदव्युत्तर पदवी आणि मुक्त विद्यापीठातील यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या शिक्षणक्रमाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र १.६ पदवीधर वेतनश्रेणी आदेश असल्यास त्यात बी.एड. करणे अनिवार्य आहे अशी अट असावी.
१.७ आरक्षण असल्यास त्यासंदर्भातील कागदपत्रे
राखीव प्रवर्ग (SC- जातीचे प्रमाणपत्र, ST जात पडताळणी. VJNTVOBC/SBC- जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमेलेअर, EWS आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला)
१.८ सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी आदेश व सेवा अनुभव मराठीत भाषांतर
२) प्रवेश अर्ज भरतांना घ्यावयाची काळजी
२.१ प्रवेश अर्ज भरण्याचा दिनांक २१/०८/२०२३ ते १२/०९/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत) आहे
२.२ विद्यापीठाचा पूर्वीचा विद्यार्थी असल्यास व आपणाकडे १६ अंकी कायम नोंदणी क्रमांक असल्यास त्याचा वापर करून बी.एड. फॉर्म भरावा. अन्यथा No वर Click करून पुढील फॉर्म भरावा. सायबर कॅफेमधून प्रवेश अर्ज भरत असल्यास अचूक माहिती भरली जात आहे त्याची खात्री करा.
२.३ अर्जदारास आलेला ID व पासवर्ड Printout काढून ठेवा किंवा लिहून ठेवा.
२.४ प्रवेश अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी. २.५ प्रवेश अर्ज भरतांना अर्जदाराचा स्वतःचा मोबाईल क्र. ई-मेल द्यावा. मोबाईल नंबर वर Do not Disturb (DND) सर्विस
Active केलेली नसावी.
२.६ खुल्या प्रवर्गासाठी प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. १,०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे.
२.७ अर्जदार ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे त्याच जिल्ह्यातून (ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच अभ्यासकेंद्र आहे) प्रवेश अर्ज भरावयाचा आहे.
२.८ मुंबई आणि उपनगरसाठी अभ्यासकेंद्रांची माहिती माहितीपुस्तिकेत दिलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करावी.
२.९ प्रवेशार्थीने प्रवेश अर्ज स्वसंपादन दिनांक १३/०९/२०२३ ते १५/०९/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत) आहे. या तारखेनंतर प्रवेशार्थीला प्रवेश अर्जात स्वतःला कोणतेही बदल करता येणार नाही.
१) बी. एड. २०२३-२५ प्रवेश प्रक्रीयेबाबतची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात येते. त्यामुळे वेळोवेळी वेबसाईटला भेट देणे ही प्रवेशार्थीची जबाबदारी आहे. बी.एड. प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार विद्यार्थ्याशी केला जात नाही.
२) बी.एड. शिक्षणक्रम प्रवेश गुणवत्तेनुसार व नियमानुसार दिला जातो. अन्य कोणताही मार्ग सूचित केल्यास मा. कुलसचिवांकडे लेखी तक्रार करावी.
३) प्रवेश संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास b.ed_admission@ycmou.ac.in या मेल आयडीवर पाठवावी.
प्रवेश प्रक्रिया सुरू
अंतिम दिनांक: १२ सप्टेंबर २०२३ (रात्री ११.५९ मि.)
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या खालील संकेतस्थळास भेट द्यावे
खालील लिंक वर क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपण उत्सुक आहात याचा आम्हाला आनंद वाटतो.
- • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
- ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
- ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
- ऑनलाईन प्रवेशअर्ज पूर्ण भरण्यास आपल्याला कधीही काही अडचण अथवा अडथळा आपणास उद्भवल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या घ्यावे


आपली प्रतिक्रिया व सूचना