राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक
व्हिडीओ निर्मिती स्पर्धा सहभागी
लिंक उपलब्ध ! आपली नोंदणी करा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ११ मे २०२३ नुसार शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक प्रशिक्षक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुली स्पर्धा २०२३-२४ चे शासनामार्फत आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचे नामांकन प्रक्रिया दिनांक २४ जुलै, २०२३ पासून सुरु होत आहे.
सदरच्या चळवळीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारे ई-साहित्य हे राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे साठी संदर्भीय तसेच अध्ययन पूरक ठरणार आहेत. सदरच्या खुल्या स्पर्धेचे निकष, गटनिहाय विषय व पारितोषिकाबाबत सविस्तर तपशील
शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे.
मुदतवाढ
दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी
खालील लिंकवर क्लिक करून सदरच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता
दिनांक २४ जुलै २०२३ पासून इच्छिणाऱ्या शिक्षकांना या प्रणालीवर आपले नामांकन करता येईल तसेच या प्रणालीवर स्पर्धेबाबतचा सर्व तपशील व निकष उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये; तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या स्पर्धेबाबतच्या सविस्तर निकष देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत लवकरच निर्गमित केले जातील. तरी जास्तीत जास्त शिक्षक / मुख्याध्यापक/ शिक्षक प्रशिक्षक यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
( स्वाक्षरीत )
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
What's Up Group Join
What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना