Sanch Manyata Student Aadhaar In Student Portal

शाळेची संच मान्यता 2022 - 23

विद्यार्थी आधार आधारित होणार

आधार आधारित संच मान्यता करण्यासाठी स्टुडंट पोर्टलवर आवश्यक सुविधा देण्याबाबत ! शासन परिपत्रक निर्गमित

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सन २०२२-२३ च्या संच मान्यता शासन निर्णय दिनांक ०६/२/२०२३ मधील तरतूदीनुसार वैध आधार विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेल्या आहेत. 

SARAL Student Portal Maharashtra Gov

विद्यार्थ्याच्या आधार वैध करताना येत असलेल्या खालील विविध अडचणी येत होत्या.

१. शाळांतील कांही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसणे

२. वारंवार प्रयत्न करुनही इनव्हॅलीड राहणे.

या कारणास्तव शाळांच्या मंजूर पदावर परिणाम होवू नये म्हणून ज्या शाळांची आधार वैध विद्यार्थी संख्या ९० टक्के पेक्षा अधिक आहे त्या शाळांना शिक्षण संचालनालयाचे पत्र दिनांक ०७/०६/२०२३ अन्वये गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवरुन शाळेत नियमित येत असलेल्या विद्यार्थ्याचे केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पडताळणी करुन अशा विद्यार्थ्यांना विचारात घेण्यात आले आहे.

सन २०२२-२३ या वर्षाच्या संच मान्यतेसाठी संदर्भ दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ अशी विचारात घेवून संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. अद्यापही कांही शाळांच्या बाबतीत दिनांक ३०.११.२०२२ रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यापैकी काही विद्यार्थी खालील कारणास्तव शाळेत नाहीत.

१. विद्यार्थ्याचे अन्य शाळेमध्ये झालेले स्थलांतर

२. शाळेत गैरहजर असल्याने शाळेने पटावरुन नाव कमी करणे (Out of School), ३. विद्यार्थ्याची दुबार नोंद

वरील कारणामुळे दि. ३०.११.२०२२ रोजी पटावर असलेल्या विद्याथ्र्यांपैकी कांही विद्यार्थी शाळेत नियमित नसल्यामुळे ते विद्यार्थी इनव्हॅलीड आहेत या कारणामुळे ८५ टक्के विद्यार्थी आधार व्हॅलीड होत नाहीत, त्यामुळे या शाळांच्या संच मान्यता झालेल्या नाहीत. या विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, अन्यत्र स्थलांतरीत झाले आहेत केवळ अशा ज्या विद्यार्थ्यांची शाळांनी दिनांक ३१/०७/२०२३ पुर्वीची नावे कमी (Out of School) केली असतील अशी विद्यार्थी संख्या दिनांक ३०/११/२०२२ च्या संदर्भ दिनांकामधून वगळण्यात येत आहे.

ज्या शाळा दिनांक ३१/०७/२०२३ नंतर कांही विद्यार्थ्याच्या बाबतीत नाव कमी (Out of School) करतील अशा विद्यार्थ्याची पडताळणी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या मार्फत करण्यात येईल व शाळेतून नाव कमी केलेले विद्यार्थी नियमित येत नसल्याची खात्री पटल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर खाली नमूद केल्यानुसार अपडेट करता येतील.

शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्याना संच मान्यतेतून कमी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर Sanch) Manyata या मेनूमध्ये Sanch Manyata Rejection 2022-23 यावर क्लिक केल्यानंतर संबंधित शाळेचा Udise Code सुविधा नमुद केल्यानंतर search button वर क्लिक केल्यानंतर पात्र विद्यार्थ्याच्या नावासमोरील शेवटच्या Rejection Status आलेली या रकान्यातील चौकोना टिक करावे व त्यानंतर Reject यावर क्लिक करावे. या प्रमाणे कार्यपध्दती असेल. 

कांही विद्यार्थी शाळेत नियमित येत असतील आणि त्याचा आधार इनव्हॅलीड असेल तर अशा विद्यार्थ्याचे नांव या सुविधेच्या आधारे कमी करण्यात येवू नये.

या पार्श्वभूमीवर सन २०२२-२३ च्या प्रलंबित संच मान्यता पूर्ण होण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी

१. सध्यस्थितीत ज्या शाळांचे दि. ३०/११/२०२२ रोजीच्या पटाचे आधार वैधते प्रमाण ८५ टक्के पेक्षा कमी

आहे अशाच शाळांना ही सुविधा असेल व या शाळांचीच नावे गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर दिसतील

२. दि.३०/११/२०२२ रोजीच्या पटाचे आधार वैधते प्रमाण ८५ टक्के पेक्षा कमी अशा शाळांनी शाळा सोडणे (Out of School), दुबार नोंद असल्याच्या नोंदी दिनांक ३१/०७/२०२३ नंतर केल्या असतील तर केंद्र प्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांच्या कडून सदर विद्यार्थी शाळेत येत नसल्याची खात्री करुन घ्यावी. शिक्षण विस्तार अधिकारी / केंद्र प्रमुख यांच्या यासोबतच्या अहवालाच्या आधारे संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांना पोर्टलवर दिलेल्या सुविधेच्या आधारे रिजेक्ट करावे व याबाबतचे अभिलेख त्यांच्याकडे ठेवावेत.

सदरच्या संच मान्यता हया अंतरिम संच मान्यता म्हणुन करण्यात येतील व कांही कालावधीनंतर उर्वरित व्हॅलीड होणारे विद्यार्थी विचारात घेवून अपडेट करण्यात येईल. अपडेट केल्यानंतर पदांमध्ये बदल झाल्यास ते बदल विचारात घेण्यात येतील.

या शाळांच्या तसेच ८५ टक्के आधार वैध नसल्याने संच मान्यता प्रलंबित राहणार नाहीत त्यामुळे सन २०२२-२३ मधील संच मान्यतेची कार्यवाही पुर्ण होईल.

प्रलंबित संच मान्यता पुर्ण करण्याची कार्यवाही करण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही करावी व तसे आपल्यास्तरावरुन आवश्यक त्या सूचना सर्व संबंधिताना देण्यात याव्यात, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

What's Up Group Join

मराठी शिक्षकांसाठी सूचना

गणित शिक्षकांसाठी सूचना

पायाभूत चाचणी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.