शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची
मोठी घोषणा ! - राज्यातील काही
मराठी शाळा आता इंग्रजी माध्यमात
होणार!! सविस्तर वाचा
मा शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य :- इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तीत कराव्या लागणार आहेत.
यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे.
30 हजार शिक्षकांची भरती करीत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांचीदेखील भरती केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री
इंग्रजी ही ज्ञानाची आणि जागतिक संवादाची भाषा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राज्यातील काही मराठी शाळा इंग्रजी माध्यमात होणार - हि बातमी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा


आपली प्रतिक्रिया व सूचना