मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
मराठी भाषा आणि शिक्षक या
विषयावर ऑनलाईन वेबिनार !
SCERT Pune
प्रति,
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) (सर्व)
मराठी भाषा गौरव दिनाबाबत
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत 'मराठी भाषा आणि शिक्षक या विषयावर परिषदेच्या अधिकृत यु टूब चॅनेलद्वारे व्याख्यानाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
तरी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांना या लिंक वर जॉईन होऊन सदर व्याख्यानाचा लाभ घेणे करिता आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
तसेच आपल्या स्तरावरून मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
कालावधी - दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी
वेळ - 12 :00 वाजता
सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
प्रश्नमंजुषा स्पर्धा व आकर्षक
प्रमाणपत्र मिळवा
खालील लिंक वर क्लिक करा
आपली प्रतिक्रिया व सूचना