मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा"
अभियानाचे गिनीज बुक रेकॉर्ड
होणार ! जाणून घ्या सविस्तर
पुणे:- राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १.०३.३३३ शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
MUKHYAMANTRI MAZI SHALA SUNDER SHALA
सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.
राज्य शासनाने या अभियानांतर्गत संकेतस्थळ विकसित केलेले आहे.
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा :- विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य तसेच वर्गशिक्षकास मा.मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे
प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र पाच विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार मिळणार. विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य तसेच वर्गशिक्षकास मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृद्धींगत होण्यासाठी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ मुलांना घ्यायची आहे
सहभागी होण्यासाठी सूचना
सदर अभियानाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे विद्यार्थ्यांना स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. विद्यार्थी व पालकांसोबतची माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदेशपत्रासह सेल्फी अपलोड करणे अपेक्षित आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.
• मुख्यमंत्री संदेश पत्र अभिप्राय
गिनीज बुक रेकॉर्ड बाबत काही महत्वाच्या सूचना
• एकूण 3 विषयावर विद्यार्थी अभिप्राय लिहू शकतील
• मा मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्र
• आपल्या शाळेविषयी मत
• शिक्षणाचे जीवनातील महत्त्व
उपक्रमाचे नाव : Largest online photo album of "Handwritten Notes in 24 hours".
• मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
• सर्वांनी वरील लिंकवर क्लिक करून माहिती भरून अभिप्राय अपलोड करा
• सर्व माहिती तपासून Submit करावे
हे पण वाचा
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
राज्यातील प्राथमिक शाळांचा वेळ
बदलणार ! परिपत्रक जाहीर
We felt very happy that you all are doing this good things for us. We thank you very much. Because you all are giving us uniforms and Shoes and socks. You all are working so hard to take out the heavy luggage from our school bags. We are very very thankful to you all thank you so much for doing so much for us.
ReplyDeleteWe are vey happy for new law made by government
ReplyDeleteMukhyamantri sandesh Patra abhipray
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना