लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने PAT परीक्षा वेळापत्रक बदलणे बाबत
कार्यालयाचे पत्र जा.क्र राशेसंप्रपम / पाचवी आठवी परीक्षा व PAT/मूल्यमापन /२०२३- २४/१६७५ दि.२५/०३/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील लोकसभा निवडणूक विषयक प्रशिक्षण दिनांक. ०१/०४/२०२४ ते १५/०४/२०२४ या कालावधित आयोजित केलेले असल्याचे कळविले आहे.
तसेच सदर पत्रात PAT परीक्षेच्या वेळापत्रकात बदलणेबाबत सूचित करण्यात आले आहे..
परंतु दिनांक ४, ५ व ६ एप्रिल २०२४ या कालावधीत PAT परीक्षेचे आयोजन राज्यात एकाच वेळी सर्वत्र केले आहे. तसेच माहे एप्रिल २०२४ च्या दुस-या आठवड्यात इयत्ता ५ वी व ८ वी करिता वार्षिक परीक्षेचे आयोजन शासन निर्णय दिनांक ०७ डिसेंबर २०२३ नुसार करणेत आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत संकलित मूल्यमापन २ ( PAT, ३) परीक्षेचे वेळापत्रक बदलणे शक्य नाही.
तथापि सकाळच्या सत्रात सदर परीक्षेचे आयोजन करून शिक्षकांनी निवडणूक प्रशिक्षणास उपस्थित रहावे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये परीक्षेच्या कालावधीत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण असल्यास त्या दिवशीचा त्या शाळेचा पेपर
दिनांक ०८/०४/२०२४ रोजी घेण्याबाबत परवानगी विशेष बाब म्हणून देण्यात येत आहे.
सदर सूचना आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्त शाळांना देण्यात याव्यात.
आपली प्रतिक्रिया व सूचना