SSC Board Examination Maharashtra Result Verification All Process

दहावी बोर्ड परीक्षा 2024 निकाल 

गुणपडताळणी व छायांकित प्रत 

साठी अर्ज सर्व प्रक्रिया समजून घ्या 

SSC Board Examination Maharashtra 2024 :- 

इयत्ता दहावीच्या निकालाची

आता प्रतिक्षा संपली, दहावी बोर्ड परीक्षा निकाल दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आले आहे 

विभागनिहाय निकाल

पुणे – 96.44, नागपुर – 94.73, संभाजीनगर – 95.19, मुंबई – 95.83, कोल्हापूर – 97.45, अमरावती – 95.58, नाशिक – 95.28, लातूर – 95.27, कोकण – 99.01 याप्रमाणे विभागीय निकाल लागलाय. यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. विशेष म्हणजे कोकण विभागात अशी एकही शाळा नाही, जिचा निकाल झिरो टक्के आहे.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन

खालील लिंक वर क्लिक करा

                गुण पडताळणी 

 (http://verification.mh-ssc.ac.in) 

स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८/०५/२०२४ ते मंगळवार, दिनांक ११/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card / Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

२) मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक ३१/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,

आपला निकाल पाहा 

खालील लिंक वर क्लिक करा

              निकाल पहा 

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad