Ads Area

PM Poshan Shakti Nirman MDM Portal Online Update Enrollment

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण 

योजनेतर्गत एमडीएम पोर्टलवर 

विद्यार्थी संख्या (Enrollment) 

अद्ययावत करण्याबाबत

MDM Portal Online:- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येत आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभाची माहिती शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एमडीएम पोर्टलवर शाळा स्तरावरुन भरणे आवश्यक आहे. याबाबत माहे एप्रिल, २०२४ पासून संचालनालयामार्फत वेळोवेळी आवश्यक लेखी स्वरुपात तसेच ऑनलाईन बैठकादवारे आपणास सुचना देण्यात आलेल्या आहेत. 

योजनेंतर्गत पात्र शाळांनी एमडीएम पोर्टलवरील शाळा लॉगिनमध्ये सन २०२४- २०२५ करिताची विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत केलेली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत केंद्र शासनाकडून वारंवार आढावा घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. आपल्या अधिनस्त योजनेस पात्र शाळांना एमडीएम पोर्टलमधील विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत करण्याच्या सुचना देण्यात याव्यात.

२. योजनेस पात्र विद्यार्थी संख्या (Enrollment) एमडीएम पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी दिनांक १९/०७/२०२४ पर्यंत कालावधी निश्चित करुन देण्यात येत आहे. प्रस्तुत बाबत कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.

३. शाळांमधील विद्यार्थी संख्येमध्ये वाढ अथवा घट झाल्यास याबाबतची माहिती शाळा स्तरावरुन एमडीएम पोर्टलवर अद्ययावत केली जाईल याबाबतच्या सुचना शाळांना देण्यात याव्यात.

४. एमडीएम पोर्टलमध्ये विद्यार्थी संख्या (Enrollment) अद्ययावत न केल्यामुळे शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.

५. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या दैनदिन लाभाची माहिती एमडीएम पोर्टलवर भरणे अनिवार्य

आहे. त्यामुळे शाळा स्तरावर देण्यात आलेल्या दैनंदिन लाभाची माहिती एमडीएम पोर्टलवर भरली जात असल्याची खातरजमा आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.

६. आपल्या कार्यक्षेत्रतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात नसल्याबाबतची दैनंदिन माहिती केंद्र शासनाच्या Automated Monitoring System (AMS) प्रणालीद्वारे संचालनालयास प्राप्त होत आहे.

 सदरची बाब गंभीर स्वरुपाची असून विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास क्षेत्रीय अधिकारी/केंद्र प्रमुख यांना संबंधित शाळेवर पाठवून त्याच दिवशी अहवाल प्राप्त करुन घेऊन आवश्यक उपाययोजनात्मक कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

७. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शाळा स्तरावरील लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरली जाईल याकरीता आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सदरची माहिती भरली जात

असल्याबाबतचा तालुका स्तरावरुन आढावा घेण्यात यावा. शासन/संचालनालयाने ऑनलाईन कामकाजाबाबत वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार विषयक कारवाईचा प्रस्ताव मा. आयुक्त (शिक्षण) यांचेकडे सादर करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी, असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे 

विद्यार्थी संख्या MDM पोर्टलवर अपडेट करण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप करा

Update Enrollment Step

➤ प्रथम खालील लिंक वर क्लिक करा

          MDM Portal 

आपल्या शाळेचा MDM Portal यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा

➤ लॉगिन झाल्यावर मेनू बार वर क्लिक करा

➤ त्यानंतर Enrollment टॅब वर क्लिक करा

➤ आता आपल्या शाळेची वर्ग निहाय पटसंख्या भरा

➤ आपण भरलेली माहिती एक वेळा तपासून पहा

➤ सर्व माहिती बरोबर असल्यास Save वर क्लिक करून करा 

➤ माहिती Save केल्यानंतर Finalize करा

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad