शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार ! वाचा सविस्तर
स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत दि. 14 सप्टेंबर 2024 ते दिनांक 02 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत शासनाने दिलेले विहित उपक्रम काटेकोर पणे राबविणे बाबत
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने सदर्भीय शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या वतीने देशभरात दिनांक 14 सप्टेंबर 2024 ते दिनांक 02 आक्टोंबर 2024 या कालावधीत स्वच्छता हि सेवा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्या बाबत शासन निर्देश आहे.
सदर उपक्रम हा सर्वच शासकिय विभांगांना राबविणे अनिवार्य आहे.
या मध्ये शालेय स्तरावर खालील प्रमाणे उपक्रम
1) टाकऊ पासून टिकावू वस्तू तयार करणे.
2) रॅली चे आयोजन करणे
3) शालेय परिसर व ग्राम परिसर स्वच्छता श्रमदान
4) सांस्कृतिक कार्यक्रम / पथनाटय
5) स्वच्छता प्रतिज्ञा
6) स्वच्छतेवर आधारीत विविध स्पर्धा भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विविध खेळ प्रतियोगीता आयोजीत करणे. करिता आपण सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्यध्यापकांना अवगत करुन या मध्ये सदर उपक्रमाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करणे करिता आदेशत करावे.
तालुका व ग्रामस्तरावर सफाई कर्मचारी यांचे सफाई मित्र शिबीर आयोजीत करावयाचे असून,
तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी सदर कर्मचा-यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना हातमोजे, मास्क ई.
सुविधा शिबीरा मध्ये उपलब्ध करुन देणे बाबत संबधीताना अवगत करावे. यात हयगय होणार नाही यांची दक्षता घ्यावी.
ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 14 सप्टेंबर 2024 ते दिनांक 02 आक्टोंबर 2024 अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून, ग्रामस्तरावर कार्यरत सीआरपी यांचे माध्यमातून सर्व उपक्रमांमध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा या करिता तालुका अभियान व्यवस्थापक उमेद यांनी नियमीत पाठपुरावा करावा.
स्वच्छता हि सेवा उपक्रमाची यशस्वी अंमबजावणी करुन दिनांक 14 सप्टेंबर 2024 ते दिनांक 02 आक्टोंबर 2024 या कालावधीत शासनाने नेमुण दिलेल्या सर्व उपक्रमांची काटेकोर अंमबजावणी होईल तसेच सर्व उपक्रमांचे
https://swachhatahiseva.gov.in/
या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर इव्हेंट क्रीऐट करुन उपक्रम राबवून त्याचे फोटो अपलोड करून इव्हेन्ट क्लोज करुन घेणे
व सर्व ग्रामपंचायतीमध्ये सदर उपक्रम प्रभावी पणे राबविले जातील यासाठी ग्रामपनिहाय नियमीत पाठपुरावा करुन आढावा घ्यावा. या बाबत मी उपक्रम कालावधीत रोज सायं. 5.40 वा. वि.अ. (आरोग्य) व उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने सर्व संबधीतांचा दैनिक कार्यवाही बाबत व्हीसी व्दारे आढावा घेणार आहे यांची नोंद घ्यावी.
सहपत्र – स्वच्छता हि सेवा उपक्रम दैनिक कार्यक्रम सुधारित.
आपली प्रतिक्रिया व सूचना