खूशखबर ! महागाई भत्त्याच्या दरात
3% ने वाढ !!! शासन परिपत्रक
निर्गमित, वाचा सविस्तर
Dearness allowance 2025 :-
अखेर राज्य कर्मचाऱ्यांना ५३ % दराने महागाई भत्ता लागु ; शासन निर्णय निर्गमित
दिनांक १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ अखेर ७ महिन्याचा ३% महागाई भत्ता फरक फेब्रुवारी २०२५ च्या पगारातून मिळणार...
आता DA झाला ५०% वरुन ५३%
शासन आदेश दिनांक २५ फेब्रुवारी,२०२५
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय -
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५०% वरुन ५३% करण्यात यावा.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२४ ते दिनांक ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा, असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
• महत्त्वाचे मुद्दे •
• महागाई भत्ता वाढ – 50% वरून 53%
• अंमलबजावणी दिनांक – 1 जुलै 2024 - पासून
• थकबाकीची रक्कम – फेब्रुवारी 2025 मध्ये रोखीने दिली जाणार
• हा भत्ता सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना लागू असेल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२२५१५५३३५८४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना